मुंबई - Divyanka Tripathi : टीव्ही स्टार दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया त्यांच्या युरोप ट्रिपदरम्यान अडचणीत सापडले आहेत. हे जोडपे त्यांच्या लग्नाचा 8वा वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशात गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे जोडपे फ्लोरेंसमध्ये खूप एन्जॉय करत होते. दिव्यांका आणि विवेकही चाहत्यांसाठी त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. दरम्यान या दाम्पत्याच्या आनंदावर विरजण पडून त्यांची कार चोरीला गेली असून त्याचे 10 लाख रुपये आणि पासपोर्ट चोरट्यांनी लंपास केला आहे. या जोडप्यानं सोशल मीडियावर ही माहिती दिली आणि फ्लोरेंसमधून कोणतीही मदत न मिळाल्यानं त्यांनी भारत सरकारकडे मदतीचं आवाहन केलंय.
दिव्यांका त्रिपाठी कार चोरीला गेली : आता दिव्यांकानं तिथून माहिती दिली आहे की, तिच्या सामानाची माहिती मिळत आहे आणि तक्रारही नोंदवण्यात आली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर लोक या जोडप्याला बेफिकीर म्हणत ट्रोल करत होते. आता संदर्भात दिव्यांकानं ट्रोल करत असणाऱ्यांना याप्रकरणापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. तिनं तिच्या पोस्टवर लिहिलं, "जेव्हा कार चोरीला गेली तेव्हा ती रिसॉर्टच्या सुरक्षित जागेत उभी होती, त्यामुळे कृपया आम्हाला सांगू नका की तुमच्या सामानाची काळजी कशी घ्यायची, रिसॉर्टच्या लोकांना माहित होते की आमची कार पार्क आहे. हे कोणाबरोबर होऊ शकते, परंतु मला आशा आहे की आपण मदत करू शकत नसाल तर सहानुभूती व्यक्त करू शकता. आमच्यासाठी हा काळ खूप कठीण आहे, कृपया आम्हाला सल्ला देऊ नका."
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल : दिव्यांका त्रिपाठीनं तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे." विवेक आणि दिव्यांकानं सांगितले होतं की, त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यातही याबाबत तक्रार केली होती, तेव्हा पोलिसांना घटनास्थळावरून कोणतेही सीसीटीव्ही फुटेज सापडले नसल्याचं सांगून त्यांना बाहेर काढून टाकले होते. यानंतर या जोडप्यानं तेथील भारतीय दूतावासात याबाबत तक्रार केली होती. आता दिव्यांका त्रिपाठीबरोबर झालेल्या घटेनाबाबत अनेकजण दु:ख व्यक्त करत आहेत.