ETV Bharat / entertainment

इटलीत पासपोर्ट हरवलेल्या दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाला भारतीय दूतावासाकडून मदतीचा हात - Divyanka Tripath and Vivek Dahiya - DIVYANKA TRIPATH AND VIVEK DAHIYA

Divyanka Tripathi :अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सुट्टीसाठी इटलीला गेली होती. या ठिकाणी तिचा पासपोर्ट आणि काही रोख रक्कम चोरीला गेली. त्यानंतर ती इटलीमध्ये अडकली होती. या घटनेनंतर तिनं सोशल मीडियावर मदतीचं आवाहन केलं होतं. आता तिला भारतीय दूतावासाकडून मदत मिळाली आहे.

Divyanka Tripathi
दिव्यांका त्रिपाठी ((IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 11:16 AM IST

मुंबई - Divyanka Tripathi : टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे आहेत. दोघेही नुकतेच सुट्टीसाठी इटलीला गेले होते आणि त्याच दरम्यान त्याचा पासपोर्ट आणि पैसे इटलीतील फ्लॉरेन्स शहरातून चोरीला गेले. यानंतर या जोडप्यानं भारतीय दूतावास आणि इटालियन प्रशासनाकडे मदत मागितली होती. दोघांनाही मदत मिळाली आणि आता बऱ्याच दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. दोघेही लवकरच भारतात परतणार आहेत. या जोडप्यानं भारत सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली होती.

दिव्यांका मायदेशी परतणार : रविवारी रात्री, या जोडप्यानं त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला. या फोटोत दोघेही इटलीतील भारतीय दूतावासानं जारी केलेले आपत्कालीन प्रमाणपत्रे हातात धरून हसताना दिसत आहेत. दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक लवकरच भारतात परतणार असून या जोडप्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहितीही दिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं या दोघांनी लिहिलं, "लवकरच भारतात येत आहे. तुमच्या अफाट प्रेम आणि समर्थनाबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो. आमचे मायदेशी परतणे शक्य केल्याबद्दल भारतीय दूतावासाचे खूप खूप आभार."

कशी घडली घटना : इटलीतील फ्लॉरेन्स शहरात बुधवारी दुपारी दोघेही जेवायला बाहेर गेले होते, त्याचवेळी त्याची कार रिसॉर्टमध्ये उभी होती, जिथे त्याला चेक इन करायचे होते. दिव्यांकानं सांगितलं की, "चोरट्यांनी आमच्या भाड्याच्या कारची खिडकी तोडून काही आवश्यक वस्तू, पासपोर्ट, रोख रक्कम आणि कार्ड घेतले, आमच्याकडे काही गोष्टी शिल्लक आहेत. आमची कार देखील बदली केली गेली होती, कारण त्याचं इंश्योरेंस होतं." दरम्यान जर भारतीय नागरिकांचे पासपोर्ट हरवले आणि खराब झाले तर त्यांना आपत्कालीन प्रमाणपत्र दिले जाते. त्याप्रमाणे त्यांना भारतीय दूतावासकडून मदत मिळाली आणि त्यांचा परतीचा मार्ग सुकर झाला.

दिव्यांका 'ये है मोहब्बतें' आणि 'बनू में तेरी दुल्हन' सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. 'ये है मोहब्बतें' या शोमध्ये दिव्यांका आणि विवेक एकत्र दिसले होते. या शोच्या सेटवर दोघे प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवेकनं 2013 मध्ये 'ये है आशिकी'मधून टेलिव्हिजन डेब्यू केला होता. 2016 मध्ये दिव्यांकानं विवेकबरोबर लग्न केलं होतं.

हेही वाचा :

  1. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाचे युरोप सहलीत 10 लाखासह कार आणि पासपोर्ट झाले लंपास - Divyanka Tripathi and Vivek Dahiya

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.