ETV Bharat / entertainment

डिंपल कपाडियानं मुलगी ट्विंकल खन्नाबरोबर फोटो काढण्यासाठी दिला नकार, व्हिडिओ व्हायरल - DIMPLE KAPADIAS VIDEO VIRAL

डिंपल कपाडियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती ट्विंकल खन्नाबरोबर फोटो काढण्यास नकार देत आहे.

Dimple Kapadia
डिंपल कपाडिया (Dimple Kapadia - instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 24, 2024, 11:18 AM IST

Updated : Oct 24, 2024, 12:44 PM IST

मुंबई - दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि ट्विंकल खन्ना यांच्यातील बाँडिंग अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळते. अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नाबरोबर 23 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचला होता. यात त्याची सासू ट्विंकलची आई डिंपल कपाडियाही कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी डिंपलला पापाराझींनी ट्विंकलबरोबर फोटोसाठी पोझ द्यायला लावली. यानंतर तिनं यासाठी स्पष्ट नकार दिला. यावेळी तिनं म्हटलं, "मी ज्युनियरबरोबर पोझ देत नाही, फक्त सीनियर्सबरोबर देते." आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

डिंपल कपाडिया झाली ट्रोल : सध्या मुंबई ॲकॅडमी ऑफ द मूव्हिंग इमेजचा फिल्म फेस्टिव्हल 2024 सुरू आहे. या कार्यक्रमात अक्षय कुमार पत्नी ट्विंकलबरोबर डिंपल कपाडियाच्या 'गो नोनी गो' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला गेले होते. या कार्यक्रमात संपूर्ण कुटुंबाची चांगली बाँडिंग पाहायला मिळाली. दरम्यान, डिंपलनं गंमतीनं ट्विंकलला ज्युनियर म्हणून टॅग केल्यानंतर आता अनेकजण तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. तिच्या व्हायरल झालेल्या पोस्टवर एका यूजरनं लिहिलं, 'ही दुसरी जया बच्चन आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'जया बच्चनची आत्मा डिंपल कपाडियामध्ये गेली.' आणखी एकानं लिहिलं, 'आपल्या मुलीबरोबर पोझ देत नाही काय बाई आहे.'

डिंपल कपाडियानं केला होता मुलगी ट्विंकलबद्दल खुलासा : डिंपल या कार्यक्रमात तपकिरी आणि हिरव्या रंगसंगतीच्या जॅकेटसह पांढऱ्या लेयर्ड ड्रेसमध्ये फोटोसाठी पोझ देताना दिसली. दरम्यान चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर ट्विंकल आता पुस्तके लिहिते. दरम्यान, तिच्या बुक लाँचिंग इव्हेंटमध्ये माइकवर बोलताना डिंपलनं ट्विंकलबद्दल अनेक खुलासे केले होते. तिनं अक्षय आणि ट्विंकलच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित रहस्ये सांगण्याची सुरुवात केली होती. यानंतर अक्षयनं मागून येऊन हातानं माईक बंद केला होता. यावेळी ट्विंकलचं पहिलं पुस्तक 'मिसेस फनीबोन्स ' लॉन्च केलं गेलं होतं. 67 वर्षीय डिंपल कपाडिया या वयात देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

Last Updated : Oct 24, 2024, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.