मुंबई - Raayan X Review : स्वतः दिग्दर्शन केलेला आणि अभिनय केलेला धनुषाचा 50 वा 'रायन' हा चित्रपट आज, 26 जुलै रोजी तामिळ आणि तेलुगू या दोन्ही भाषांमध्ये रुपेरी पडद्यावर दाखल झाला. पहाटेच्या स्क्रिनिंगपासून प्रेक्षकांच्या उदंड गर्दीसह चित्रपटाची अभूतपूर्व सुरुवात झाली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे विचार आणि रिव्हयू तातडीनं व्यक्त दिले आहेत. बॉक्स ऑफिसवर झालेली उत्तम सुरुवात चित्रपटासाठी अनुकूल वाटत आहे. नेटिझन्सनी चित्रपटाला 'ब्लॉकबस्टर' असे नाव दिलं आहे.
Director
— 𝓓𝕚wค𝓚𝐚г🎭ʰʸᵖᵉᵈ ᶠᵒʳ ʳᵃᵃʸᵃⁿ (@sachin_dfan) July 26, 2024
Actor
Lyricist
Singer
Fully packed performance na 🥹🙌
Sure Blockbuster!!! 🔥#Raayan @dhanushkraja https://t.co/8CfbD5GkHw
"दिग्दर्शक, अभिनेता, गीतकार, गायक, संपूर्णपणे पॅक परफॉर्मन्स. नक्कीच ब्लॉकबस्टर!!!" अशी एक प्रतिक्रिया एक्स सोशल मीडिया हँडवर आली आहे. हा कमेंट चित्रपटाच्या यशात धनुषच्या बहु-प्रतिभावान योगदानावर प्रकाश टाकणारी वाटते. दुसऱ्या सोशल मीडिया युजरनं चित्रपटाच्या पूर्वार्धाचं कौतुक केलं आहे आणि म्हटलंय की, "दिग्दर्शक म्हणून धनुषची उत्कृष्ट कामगिरी चित्रपटाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. या प्रतिक्रिया कलाकार आणि क्रू यांच्या प्रयत्नांना मिळालेली दाद वाटत आहेत.
#Raayan first half reports 💥👌.. Director #Dhanush taking center stage along with stellar performances from #SundeepKishan & co 👏. pic.twitter.com/D3zF8O6WYl
— VCD (@VCDtweets) July 26, 2024
"सत्ता, वर्चस्व आणि अधिकाराचा लोभ हृदयस्पर्शी कौटुंबिक भावनांसह उत्तम प्रकारे चित्रित केला गेला आहे. धनुषनं उत्तम प्रकारे काम केलं आहे. रायन रिव्ह्यू 3/5," ही प्रतिक्रिया धनुषच्या भूमिकेला आणि कथानकाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद दर्शवत आहे.
The Greed For Power , Dominance & Authority Has Been Portrayed Well With Heart Touching Family Emotions @dhanushkraja #Dhanush Has Performed Brilliantly & Perfectly Executed #Raayan 🔥🔥 #RaayanReview 3/5 #RaayanFromToday @SureshProdns @UrsVamsiShekar pic.twitter.com/DtI2SBN2Y4
— BA Raju's Team (@baraju_SuperHit) July 26, 2024
असं असलं तरी सर्व अभिप्राय पूर्णपणे सकारात्मक नाहीत. दुसऱ्या युजरनं कथानकाबद्दल असमाधान व्यक्त केलं आणि लिहिले, " 'रायन'च्या पहिल्या अर्ध्या भागापेक्षा सरासरी दुसरा भाग जास्त आवडला. कथेचा भाग पण पाहण्यायोग्य पण चित्रपटाबद्दल निराश."
#RaayanReview Decent 1st half . Average Second half. Loved @arrahman
— Vineeth (@Vineethm28) July 26, 2024
Score 💥 Disappointed on story part but watchable movie @dhanushkraja #DeadpoolAndWolverine#RaayanFromToday #Dhanush #D50 pic.twitter.com/OSGNyLFo07
दुसऱ्या युजरनं लिहिलं, "रायन फर्स्ट हाफ: एक सरळ कथानक आणि संघर्षाचा विकास प्रामाणिकपणे अंमलात आणला गेला आहे. इंटरव्हल स्टेजिंग अगदी अचूक आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून धनुष या टप्प्यावर पोहोचला."
#Raayan first half:
— What The Fuss (@W_T_F_Channel) July 26, 2024
A straightforward plot and conflict development which are fairly executed. The Interval staging is near perfect. Director & Actor #Dhanush peaked at this point.🔥
Off to the second half 🎯#RaayanReview #RaayanFromToday pic.twitter.com/EQs2SHnxeH
'रायन' चित्रपटाचा एक उत्कृष्ट पैलू म्हणजे एआर रहमाननं रचलेला मनमोहून टाकणारा बॅकग्राउंड स्कोअर. यामुळं चित्रपटाला भावनिक खोली जोडून लक्षणीय लक्ष वेधून घेतलं आहे. एसजे सूर्या, संदीप किशन आणि कालिदास जयराम या अभिनेत्यांचे प्रमुख अभिनय प्रशंसनीय आहेत, धनुषनं कुशलतेने प्रत्येक पात्र उत्तम विकसित केलंय आणि आकर्षक असण्यावर भर दिला आहे.
'रायन'ला CBFC ने 'A' रेटिंग दिलं आहे. भक्कम आगाऊ तिकीट विक्रीसह, रायनला लक्षणीय यश मिळण्याची अपेक्षा आहे. पहिल्या दिवशी धनुषचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल असा अंदाज बांधला जात आहे.