ETV Bharat / entertainment

धनुष स्टारर 'रायन'चा ट्रेलरचे काउंटडाऊन सुरू, निर्मात्यांनी शेअर केली अपडेट - RAAYAN TRAILER - RAAYAN TRAILER

RAAYAN TRAILER UPDATE : 'रायन' चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार याची अपडेट निर्मात्यांनी शेअर केला आहे. धनुष, कालिदास जयराम, संदीप किशन आणि एसजे सूर्या अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट 26 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Dhanush
धनुष ((Sun Pictures X handle))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 1:17 PM IST

मुंबई - RAAYAN TRAILER UPDATE : अभिनेता धनुषची मुख्य भूमिका असलेल्या 'रायन' ट्रेलरची प्रतीक्षा वाढलेली असताना, निर्मात्यांनी मंगळवारी त्यावर एक अपडेट शेअर केलं आहे. प्रॉडक्शन बॅनर सन पिक्चर्सनं चाहत्यांना ट्रेलर नेमका कधी उपलब्ध केला जाईल याची माहिती दिली. कालिदास जयराम, संदीप किशन आणि एसजे सूर्या यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 26 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सन पिक्चर्सच्या अधिकृत एक्स हँडलवर निर्मात्यांनी धनुषच्या आगामी चित्रपट रायनचा ट्रेलर कोणत्या वेळी प्रदर्शित केला जाईल याची घोषणा केली. चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले: "हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या 'रायन' चित्रपटाचा ट्रेलर आज संध्याकाळी 6 वाजता सोडत आहे." यापूर्वी, निर्मात्यांनी दुसऱ्या पोस्टरसह ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली होती.

ट्रेलरच्या वेळेच्या घोषणेवर प्रतिक्रिया देत, चाहत्यांनी पोस्टच्या कमेंट विभागात भरपूर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं: "पोस्टर (फायर इमोटिकॉन)." आणखी एकाने लिहिले: "तीव्र रॉ अ‍ॅक्शन सीन्सची अपेक्षा आहे." आणखी एका चाहत्याने कमेंट केली: "'रायन' ट्रेलर लोड होत आहे. जास्त काळ प्रतीक्षा करू शकत नाही."

चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा एक गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये राकट अ‍ॅक्शन सीन्स आहेत. सीबीएफसीने या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊन मान्यता दिली आहे. शक्तिशाली अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाचा रनटाइम 2 तास आणि 23 मिनिटांचा आहे. पा पांडी नंतर हा धनुषचा दुसरा दिग्दर्शकीय प्रयत्न आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार त्याच्या आगामी 'रायन' या चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. धनुषसाठी हा चित्रपट एक खास प्रकल्प आहे कारण हा त्याचा 50 वा चित्रपट आहे. धनुष अलीकडेच कॅप्टन मिलरमध्ये दिसला होता. या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी यूके राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 जिंकला होता.

हेही वाचा -

एआर रहमान यांनी पूर्ण केला 'रायन'चा बॅकग्राऊंड स्कोअर, धनुषनं शेअर केली पोस्ट - AR Rahman

साऊथ स्टार धनुषनं भिकाऱ्याच्या वेशात केलं सलग 10 तास शूट, समर्पण पाहून निर्मातेही झाले थक्क - South star Dhanush

धनुषच्या D50 च्या फर्स्ट लूकचे काउंटडाऊन सुरू, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.