ETV Bharat / entertainment

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घटस्फोट प्रकरणाचा अंतिम निर्णय 'या' दिवशी होईल, जाणून घ्या तारीख... - DHANUSH AND AISHWARYA

घटस्फोटासाठी धनुष-ऐश्वर्या रजनीकांत कौटुंबिक न्यायालयात हजर झाले होते. आता या जोडप्याच्या घटस्फोट प्रकरणाचा अंतिम निर्णय लवकरच येईल.

dhanush and aishwary
धनुष-ऐश्वर्या रजनीकांत (ऐश्वर्या कोर्टात धनुष (ETV Bharat))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 4:53 PM IST

चेन्नई : साऊथचा सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून विभक्त झाले आहेत. धनुष आणि ऐश्वर्यानं 17 जानेवारी 2022 मध्ये वेगळे होण्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यामातून केली होती. आता घटस्फोटासाठी तो पहिल्यांदा चेन्नई फॅमिली कोर्टात हजर झाला आहे. धनुष आणि ऐश्वर्यानं काही दिवसांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. हे दोघेही कोर्टानं दिलेल्या तारखेला तीनदा हजर झाले नाहीत, यानंतर लोक त्यांच्यात समेट होईल असा अंदाज बांधू लागले होते. आज 21 नोव्हेंबर रोजी धनुष आणि ऐश्वर्या फॅमिली कोर्टात हजर झाले. आता जाणून घ्या या दोघांच्या घटस्फोटाचा अंतिम निर्णय कोणत्या तारखेला येईल.

घटस्फोटाचा अंतिम निर्णय : ऐश्वर्या आणि धनुषच्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी 27 नोव्हेंबर ही पुढील तारीख दिली आहे. 27 नोव्हेंबरला धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटावर न्यायालय अंतिम निर्णय देईल, असं सध्या बोललं जात आहे. दरम्यान सोशल मीडियालर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये धनुष आणि ऐश्वर्या कोर्टात जात असताना मास्क घातलेले दिसले. धनुष यावेळी त्याच्या पांढऱ्या पारंपारिक लूकमध्ये चमकदार कारमधून कोर्टात हजर झाला.

धनुष आणि ऐश्वर्या यांचं लग्न कधी झाले? : धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचे 2004 मध्ये चेन्नईमध्ये भव्य लग्न झालं होतं. दरम्यान घटस्फोटची घोषणा करत धनुषनं पोस्टवर लिहिलं होतं, '18 वर्षे मित्र, जोडपे आणि आई-वडील म्हणून एकत्र राहणे आणि एकमेकांचे शुभचिंतक बनणे, एकमेकांना समजून घेणे, जुळवून घेणे आणि स्वीकारले, आज आम्ही वेगवेगळ्या मार्गावर आहोत, ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, कृपया गोपनीयता आणि आदर राखा.' धनुष आणि ऐश्वर्याला त्यांच्या लग्नापासून यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत. ऐश्वर्या साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे.

नयनताराबरोबर धनुषचा वाद : दरम्यान, नुकतेच साऊथची सुपरलेडी नयनतारानं धनुषवर काही आरोप केले आहेत. धनुषनं 'नयनतारा - द बियॉन्ड फेयरीटेल' या माहितीपटात 2015 मधील 'नानुम राउडी धान' या चित्रपटाचे 3 सेकंदाचे व्हिज्युअल वापरल्याबद्दल नयनताराला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती. यानंतर नयनतारानं एक खुले पत्र सोशल मीडियावर धनुषच्या नावानं लिहिलं होतं. यावर अनेक साऊथ स्टार्सनं नयनताराला पाठिंबा दिला होता.

हेही वाचा :

  1. नयनतारा आणि धनुषच्या लढाईत श्रुती हासननं कोणाला दिली साथ? घ्या जाणून
  2. धनुषनं नयनताराला पाठवली 10 कोटीची नोटीस, अभिनेत्रीनं सुनावले खडे बोल : जाणून घ्या प्रकरण
  3. धनुष आणि नागार्जुनच्या 'कुबेर' चित्रपटाची पहिली झलक, रश्मिका मंदान्नाचा हटके लूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.