ETV Bharat / entertainment

देवोलिना भट्टाचार्जी स्टारर 'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज , पाहा व्हिडिओ - Bengal 1947 An Untold Love Story - BENGAL 1947 AN UNTOLD LOVE STORY

Bengal 1947 : देवोलिना भट्टाचार्जी अभिनीत 'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

Bengal 1947
बंगाल 1947
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 3:26 PM IST

मुंबई - Bengal 1947 : देवोलिना भट्टाचार्जी स्टारर 'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात 1947मधील इतिहास दाखविण्यात आला आहे. 1947मध्ये देशामध्ये जी उलथापालथ झाली होती ते या चित्रपटामध्ये उत्तमप्रकारे मांडण्यात आलं आहे. हा चित्रपट भारताच्या फाळणीवर आधारित आहे. 'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी' चित्रपट 29 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. देवोलिना भट्टाचार्जीनं 'बंगाल 1947' मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज : या चित्रपटाचा ट्रेलर हा 1.29 सेंकदाचा आहे. यामध्ये 1947 रोजी भारताची फाळणी झाल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि एक सुंदर अशी प्रेमकहाणी दाखवली गेली आहे. या चित्रपटाचं लेखक आणि दिग्दर्शन आकाशदित्य लामा यांनी केलंय. 'बंगाल 1947' या चित्रपटाविषयी बोलताना देवोलिना भट्टाचार्जी म्हटलं होतं, ''मी ही भूमिका करण्यास नकार देऊ शकले नाही. या चित्रपटामुळे, मी दिग्दर्शक आकाशदित्य लामा यांना पुन्हा भेटू शकले. मला माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांच्या 'मोहेंजोदारो' नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. याव्यतिरिक्त, बंगाली आणि आसामी वारशामुळे चित्रपटाच्या एक अनोख्या विषयाबरोबर जुळण्यासाठी मी प्रेरित झाले.''

'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी' चित्रपटाची स्टार कास्ट : पुढं तिनं म्हटलं, ''फाळणीच्या भीषण अराजकतेच्या काळात प्रेमाच्या चिरस्थायी शक्तीचा शोध घेणारा हा चित्रपट उत्कृष्ट आहे. फाळणीवर आधारित प्रेमकाहणी आणि ऐतिहासिक नाटक प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिली असली, हा चित्रपट पूर्णपणे वेगळा आहे. 'बंगाल 1947' चित्रपट पाहिल्यानंतर एक वेगळा अनोखा अनुभव मिळणार आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनच करणार नाही तर तुम्हाला या विषयावर अधिक विचार करण्यास भाग पाडेल.'' या चित्रपटात देवोलीना व्यतिरिक्त, चित्रपटात ओंकार दास माणिकपुरी, सोहेला कपूर, आदित्य लखिया, अनिल रस्तोगी, प्रमोद पवार, अतुल गंगवार, विक्रम टीडीआर, सुरभी श्रीवास्तव, फलक राही आणि अंकुर अरमाम यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. सापाच्या विषाची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एल्विश यादवनं शेअर केली पहिली पोस्ट - Elvish Yadav post
  2. यश स्टारर 'टॉक्सिक' चित्रपटात साई पल्लवी की करिना असणार नायिका? निर्मात्यांनी केला खुलासा - Toxic Movie
  3. रकुल प्रीत सिंग ते क्रिती खरबंदा 'या' नववधू पहिला होळी साजरी करण्यासाठी सज्ज - first festival of colors

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.