मुंबई - Devara: Part 1 : 'देवरा: पार्ट 1' हा ज्युनियर एनटीआरचा सहा वर्षांतील सोलो लीड म्हणून पहिला रिलीज आहे. 'आरआरआर'नंतर, 'देवरा: पार्ट 1' चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर धमाका करत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहते खूप उत्सुक होते. दरम्यान 'देवरा: पार्ट 1' रिलीज होण्यापूर्वी वेगवेगळ्या शहरांमध्ये फटाक्यांसह जल्लोष केला गेला होता. बेंगळुरूमधील एका थिएटरमध्ये ज्युनियर एनटीआरच्या कट -आउटला आग लागली. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र याठिकाणी आग लागल्यानंतर खूप गोंधळ उडाला होता.
Cutout ki fire antukundhi at Sandhya, Bangalore. Everyone is Safe! ❤ Instant ga paiki velli situation ni control chesadu 👏 Kudos 👏 VIGNESH anukunta athani name... @DevaraMovie
— ViAdVar (@ViAdVar3921) September 26, 2024
Stay Safe guys! #DevaraJatharaaBegins #Devara #JrNTR #DevaraOnSep27th #DevaraCelebrations pic.twitter.com/iFRZx0CEwP
ज्युनियर एनटीआरच्या कट- आउटला लागली आग : सध्या बेंगळुरुमधील थिएटर्सच्या बाहेर ज्युनियर एनटीआरचे पोस्टर्स आणि कट-आउट्स लावण्यात आले आहेत. एक्सवर आता काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआरचे चाहते थिएटरबाहेर फटाके फोडतांना दिसत आहेत. यामुळेच ज्युनियर एनटीआरच्या कटआउटला आग लागली होती. यानंतर एका व्यक्तीनं समजदारपणा दाखवत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवता आले. यानंतर सर्वजण त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. एका एक्स यूजर्सनं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'बेंगळुरूमध्ये संध्याकाळी कट-आउटला आग लागली. सर्वजण सुरक्षित आहेत. एका व्यक्तीनं तातडीनं वर जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये आम्ही यशस्वी झालो. विग्नेश अनुकुंटा अथानी असं या व्यक्तीचं नाव आहे.'
Bangalore Sandhya లో Cutout కి fire అంటుకోగానే...Risk చేసి మరీ పైకి వెళ్ళి మొత్తం Control చేసాడు .
— 🐎🔱 సుజత్ 🕉️✝️☪️ (@Kadirodu) September 26, 2024
Take a bow 🙇
చాలా పెద్ద fire నుంచి save చేసాడు..
టైగరె కాదు Tiger ఫ్యాన్స్ కూడా massey🐯💥@tarak9999 #DevaraStorm pic.twitter.com/tcEDiJWxQU
मोठ्या आगीपासून वाचवले : याशिवाय दुसऱ्या एका यूजर्स एक पोस्ट शेअर करत विग्नेशबद्दल लिहिलं, 'जेव्हा बंगळुरूमध्ये संध्याकाळी कट-आउटला आग लागली, तेव्हा त्यानं धोका पत्करला आणि वर जाऊन संपूर्ण आगेवर नियंत्रण मिळवले, धन्यवाद. मोठ्या आगीपासून बचावले. टायगरच नाही, तर टायगरचे फॅन्सही खूप मोठे आहेत.' ज्युनियर एनटीआरचा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं चाहत्यांनी चित्रपटगृह गाठले आहेत. एखाद्या सणासारखा 'देवरा: पार्ट 1' चित्रपटाच्या रिलीजचा दिवस हा चाहते साजरा करत आहेत. ज्युनियर एनटीआरच्या सुपरहिट चित्रपटामधील गाण्यावर आता प्रेक्षक नाचताना दिसत आहेत. अनेक थिएटरच्या बाहेर एनटीआर कट-आउट असल्याचे दिसत आहेत.
हेही वाचा :
- विजय देवराकोंडानं रिलीजपूर्वी 'देवरा: पार्ट 1'साठी दिला 'हा' संदेश, पोस्ट व्हायरल - VIJAY DEVERAKONDA
- 'देवरा' इव्हेंट रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा, ज्यु. एनटीआरनं केलं फॅन्सचं सांत्वन - Devara pre release event
- बियॉन्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'देवरा पार्ट 1'चा ग्लोबल प्रीमियर, भारतीय चित्रपटाला पहिल्यांदा मान - Global Premier at Beyond Fest