ETV Bharat / entertainment

'देवरा पार्ट 1'चं रिलीज सेलिब्रेशन झालं भव्य, प्रेक्षकांनी दिली चित्रपटाला पसंती - jr ntr movie - JR NTR MOVIE

Devara Celebrations : ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक चाहते चित्रपटगृहांबाहेर जल्लोष करताना दिसत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

Devara Celebrations
देवराचा उत्सव (जूनियर एनटीआर (Film Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 12:05 PM IST

मुंबई - Devara Celebrations : साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि कोराताला शिवा यांचा बहुप्रतीक्षित ॲक्शन पॅक्ड ड्रामा 'देवरा: पार्ट 1' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं विविध शहरांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलंय. प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटगृहाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. सध्या चित्रपटगृहांमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण चित्रपटगृहांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या रिलीजचा हा पहिला दिवस आहे, त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधून काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 27 सप्टेंबर हा दिवस एनटीआरचे चाहते दिवाळी सारखा साजरा करत आहेत.

ज्युनियर एनटीआरवर केला चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव : दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला ज्युनियर एनटीआरच्या पोस्टरवर टिळक लावताना दिसत आहे. याशिवाय ज्युनियर एनटीआरच्या पोस्टरसमोर मिठाईही अर्पण करण्यात आली आहे. तसेच एका फोटोमध्ये काही केक दिसत आहेत. यावर ' देवरा' असं लिहून आहे. तसेच एका यूजर्सनं ज्युनियर एनटीआरच्या होल्डिंगचा कोलाज शेअर केला आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, त्याचे चाहते या चित्रपटासाठी किती उत्साहित आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्यात आला आहे.

'देवरा: पार्ट 1' चित्रपटाबद्दल : ज्युनियर एनटीआर आणि दिग्दर्शक कोराताला शिवाचा ॲक्शन ड्रामा 'देवरा: पार्ट 1'ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सध्या चित्रपटातील डान्स आणि ॲक्शन कोरिओग्राफीचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट देशातच नाही तर परदेशातही खूप पसंत केला जात आहे. चित्रपट समीक्षक कोर्टनी हॉवर्ड यांनी ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाचं पुनरावलोकन केलंय. एक्सवर त्यांनी लिहिलं, 'देवरा हा एक धमाकेदार आणि उत्कृष्ट एड्रेनालाईन रश आहे. यात क्रूरता, हृदयस्पर्शी दांवपेच, फायटिंग, अ‍ॅक्शन, डान्स एकत्र दिसत आहे. या चित्रपटातील फाईट कोरिओग्राफी प्रेरणादायी आहे. एन.टी. रामाराव ज्युनियर फायर.' 'देवरा: पार्ट 1' हा आता अनेकांना पसंत येत आहे. अनेकजण आपल्या प्रतिक्रिया या चित्रपटाबाबत सोशल मीडियाद्वारे शेअर करत आहेत. 'देवरा : पार्ट 1' मोठ्या धूमधडाक्यात रिलीज झाला आहे. हा एनटीआरचा सहा वर्षांतील पहिला एकल चित्रपट आहे. 'देवरा: पार्ट 1'ची आतापर्यंत 80 कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट जगभरात 100 कोटींचा टप्पा सहज पार करेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

  1. विजय देवराकोंडानं रिलीजपूर्वी 'देवरा: पार्ट 1'साठी दिला 'हा' संदेश, पोस्ट व्हायरल - VIJAY DEVERAKONDA
  2. 'देवरा' इव्हेंट रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा, ज्यु. एनटीआरनं केलं फॅन्सचं सांत्वन - Devara pre release event
  3. बियॉन्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'देवरा पार्ट 1'चा ग्लोबल प्रीमियर, भारतीय चित्रपटाला पहिल्यांदा मान - Global Premier at Beyond Fest

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.