ETV Bharat / entertainment

बियॉन्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'देवरा पार्ट 1'चा ग्लोबल प्रीमियर, भारतीय चित्रपटाला पहिल्यांदा मान - Global Premier at Beyond Fest - GLOBAL PREMIER AT BEYOND FEST

Devara Part 1 : ज्युनियर एनटीआरचा आगामी चित्रपट 'देवरा पार्ट 1'चा बियॉन्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्लोबल प्रीमियर होईल. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर काही दिवसात रिलीज होईल.

Devara Part 1
Global Premiere of Deora Part 1 (देवरा पार्ट 1 (Film Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 4:37 PM IST

मुंबई Devara Part 1 : साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर अभिनीत ॲक्शन ड्रामा चित्रपट 'देवरा पार्ट 1' रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते 'देवरा पार्ट 1'च्या रिलीजच्या तारखेची वाट पाहात नाहीत. हा चित्रपट 27 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान यापूर्वी 'देवरा पार्ट 1'च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या बियॉन्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणार आहे. या फेस्टमध्ये हॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी होतील. ज्युनियर एनटीआरच्या आगमी चित्रपटाचं आगाऊ बुकिंग हे उद्या नाही तर पुढच्या आठवड्यात सुरू होईल.

'देवरा पार्ट 1'चा ग्लोबल प्रीमियर : 'देवरा पार्ट 1'चा ग्लोबल प्रीमियर रिलीजच्या एक दिवस आधी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी होईल. लॉस एंजेलिस येथील हॉलीवूडमधील आयकॉनिक इजिप्शियन थिएटरमध्ये संध्याकाळी 6.30 वाजता हा चित्रपट दाखवण्यात येईल. 'देवरा पार्ट 1' हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याचा येथे प्रीमियर होत आहे. या चित्रपटानं उत्तर अमेरिकेत प्री-सेल्समध्ये मोठा नफा कमावला आहे. 'देवरा पार्ट 1' ची याठिकणी दहा लाख तिकिटं विकली गेली आहेत. या चित्रपटानं उत्तर अमेरिकेत प्री-सेल्समध्ये जलद गतीनं तिकिटे विक्री केली. 'देवरा पार्ट 1' चित्रपटाची निर्मिती कोराटाला शिवा यांनी केली आहे. 'देवरा पार्ट 1 ' चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान खलनायकाची भूमिका साकारत आहे.

'देवरा पार्ट 1 'ची स्टारकास्ट : या चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर व्यतिरिक्त प्रकाश राज, श्रीकांत, शायनी टॉम चाको, अजय आणि गेटअप श्रीनू यांच्या देखील विशेष भूमिका आहेत. 'देवरा पार्ट 1' चित्रपटात ज्युनियर एनटीआरनं वडील आणि मुलाची दुहेरी भूमिका केली आहे. दरम्यान सेन्सॉर बोर्डानं ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1' वर कात्री लावली आहे. या चित्रपटामधील 4 दृश्ये सेन्सॉर बोर्डाला खटकली आहेत. 'देवरा पार्ट 1' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं यूए (UA) प्रमाणपत्र दिलं आहे. या चित्रपटाचा रनटाइम 2 तास 58 मिनिटे झाला आहे.

हेही वाचा :

  1. सोलो रिलीज 'देवरा'बद्दल 'चिंताग्रस्त' ज्युनियर एनटीआर, ट्रेलर लॉन्चच्या वेळी केलं भाष्य - Devara Trailer
  2. 'देवरा पार्ट 1'मध्ये जूनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत झळकणार, नवीन पोस्टर व्हायरल - jr ntr
  3. 'देवरा पार्ट 1' मेकर्सनं नवीन पोस्टर शेअर करून ज्युनियर एनटीआरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Jr NTR Birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.