ETV Bharat / entertainment

ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा: पार्ट वन' ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज...

ज्युनियर एनटीआरचा 'देवरा: पार्ट वन' चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट कुठे प्रदर्शित होईल, याबद्दल जाणून घ्या...

देवरा: पार्ट वन
DEVARA PART 1 (देवरा (जूनियर एनटीआर (Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 2 hours ago

मुंबई - साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट 'देवरा: पार्ट वन'नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटानं जगभरात 300 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. 'देवरा: पार्ट वन' चित्रपटात ज्युनियर एनटीआरबरोबर जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील प्रमुख भूमिकेत दिसले. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. रिपोर्टनुसार 'देवरा' 8 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सनं या चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत.

'देवरा : पार्ट वन'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'देवरा: पार्ट वन' या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर खूप दबदबा निर्माण केला होता. रिपोर्ट्सनुसार, 'देवरा: पार्ट वन'नं सर्व भाषांमध्ये मिळून सुमारे 74 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह बंपर ओपनिंग केली होती. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड बॉक्स ऑफिसवर मोडेल असं निर्मात्यांना वाटत होतं. मात्र, दुसऱ्या दिवसापासून चित्रपटाच्या कमाईत घसरण सुरू झाली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तरीही चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटामधील अनेक प्रेक्षकांना ज्युनियर एनटीआरचे अ‍ॅक्शन सीन्स आवडले आहे. याशिवाय 'देवरा: पार्ट वन' चित्रपटामधील गाणी देखील लोकप्रिय झाली आहेत. दरम्यान हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये पाहता येईल.

ज्युनियर एनटीआरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण : 'देवरा : पार्ट वन' या चित्रपटानं एकूण कलेक्शन 343 कोटी रुपयांचं केलं आहे, जे अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. 'आरआरआर' चित्रपटानंतर ज्युनियर एनटीआरचा हा पहिला एकल रिलीज होता. या चित्रपटातील ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाचे लोकांनी कौतुक केले आहे. दरम्यान ज्युनियर एनटीआरबद्दल सांगायचं झालं तर आता तो हृतिक रोशन आणि कियारा अडवाणीबरोबर 'वॉर 2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटामध्ये एनटीआर आणि हृतिकचेचे भरपूर अ‍ॅक्शन सीन्स असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'देवरा पार्ट 1' पाहताना थिएटरमध्ये 'पुष्पा 2'चा टीझर पाहिल्यावर चाहते झाले उत्साहित, व्हिडिओ व्हायरल - pushpa 2 teaser
  2. जूनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1'नं बॉक्स ऑफिसवर केली मोठी ओपनिंग - Devara Box Office Collection
  3. ज्यू. एनटीआरच्या 'देवरा' शोला उशीर झाल्यानं थिएटरमध्ये तोडफोड, पाहा व्हिडिओ - Devara screening vandalize

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.