ETV Bharat / entertainment

ज्यू. एनटीआर सोलो हिरो म्हणून ग्रँड रिटर्न : 'देवरा: भाग 1' रचणार कमाईचा नवा विक्रम - Devara Box Office Collection - DEVARA BOX OFFICE COLLECTION

Devara Box Office Collection Day 1 Prediction: ज्यूनियर एनटीआरचा 'देवरा: भाग 1' हा चित्रपट आज देशसह आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या धूमधडाक्यात रिलीज झाला. कोरटाला सिवा दिग्दर्शित या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कामाई 125 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल असे संकेत मिळत आहेत. पहिल्या दिवशीचे कमाईचे आकडे कोणता प्रारंभिक अंदाज सुचवतात ते वाचा.

Devara Box Office Collection Day 1
ज्यूनियर एनटीआरचा 'देवरा: भाग 1' ((Photo: Film poster/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 2:17 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर कोरटाला सिवा दिग्दर्शित 'देवरा: भाग 1' या चित्रपटातून स्वतंत्र नायक म्हणून पुनरागमन करत आहे. 2022 मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर 'आरआरआर' चित्रपटानंतर ज्यू. एनटीआरचा पहिला चित्रपट आज, 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सोलो रिलीज असलेल्या त्याच्या या चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस ओपनिंग किती असेल याबद्दल चाहत्यांसह सिने अभ्यासकांनाही उत्सुकता लागून राहिली आहे.

'देवरा'च्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्श्नकडून मोठ्या अपेक्षा -

'देवरा: भाग 1' हा चित्रपट भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे चांगले ओपनिंग मिळण्याची शक्यता दुणावली आहे. या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सुमारे 125 कोटी रुपये कमाई केल्याची निर्मात्यांनी अपेक्षा केली आहे.

चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग तिकीट विक्री उल्लेखनीय आहे, प्री-बुकिंगने एकट्या भारतात (ब्लॉक सीट्ससह) 40 कोटीचा आकडा ओलांडला आहे आणि जागतिक स्तरावर 75 कोटी ओलांडले आहेत, असे इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने म्हटले आहे. प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असलेल्या असलेल्या 'कल्की 2898 एडी' चित्रपटानंतर, जगभरातील बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या क्रमांकाची कमाई करणारा 'देवरा' हा एक प्रबळ दावेदार भारतीय चित्रपट आहे.

मजबूत तिकीट विक्रीची शक्यता

'कल्की 2898 एडी'ने जागतिक स्तरावर त्याच्या पहिल्या दिवशी 177.70 कोटी रुपयांची कमाई केल्यामुळे, 'देवरा' चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. सॅकनिल्कच्या मते, जगभरात सुमारे 75 कोटी रुपयांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग नोंदवली गेली. भारतात, चित्रपटाने प्री-सेल्समध्ये आधीच अंदाजे 45 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर परदेशात तिकीटांची विक्री 3.6 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 30 कोटी) आहे.

सुरुवातीच्या वीकेंडसाठी 'देवरा'कडून 90 कोटी रुपयांच्या पुढे प्रगत विक्रीचा अंदाज व्यक्त केला आहे. 'कल्कि 2898 AD' नंतर 'देवरा' 2024 मधील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग कमाई देणारा चित्रपट म्हणून उदयास येण्याची शक्यता असल्याचे संकेत यामुळे मिळतात.

तेलुगु मार्केट्समध्ये अपेक्षित कमाई

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये, 'देवरा' चित्रपटाने पहिल्या दिवशी 65-70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 85-90 कोटींच्या दरम्यान असू शकते. 'देवरा'ला मिळालेला अभूतपूर्व प्री-सेल्स प्रतिसाद जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई होणार असल्याचं दर्शवत आहे. 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा ज्यू. एनटीआरचा हा सलग दुसरा चित्रपट आणि अशी ओपनिंग मिळवणारा त्यांचा पहिला सोलो प्रोजेक्ट आहे.

प्रादेशिक मार्केटमध्ये 'देवरा'ची मजबूत पकड

प्री-सेल्स ट्रेंडच्या आधारे बोलायचं झालं तर, कर्नाटकमध्ये, प्री-सेल्स देखील आशादायक आहेत, 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळकत अपेक्षित आहे. तामिळनाडू आणि केरळचे एकूण योगदान सुमारे 3 कोटी रुपयांचे आहे, तमिळनाडूने अधिक मजबूत कामगिरी दर्शविली आहे.

'देवरा' साठी उत्तर भारतीय बाजारपेठ देखील महत्वाची आहे. 'आरआरआर'च्या यशानंतर, ज्यू. एनटीआरच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कामगिरीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हिंदीमध्ये प्री-सेल्स उत्कृष्ट नसले तरी अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये त्यांनी अलीकडील काही मोठ्या बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. या मार्केटमध्ये 5-6 कोटींची सुरुवात ही एक ठोस सुरुवात मानली जाऊ शकते.

जागतिक बॉक्स ऑफिसकडूनही मोठ्या अपेक्षा

आंतरराष्ट्रीय पातळीवर 5 दशलक्ष डॉलर्स ( सुमारे 40 कोटी ) ही उत्तम सुरुवात मानली जाऊ शकते. हा अंदाज कायम राहिल्यास, जगभरातील ओपनिंग अंदाजे रु. 125-130 कोटींपर्यंत पोहोचू शकते. हे ज्यू. एनटीआरचे आजवरचे सर्वात मोठं ओपनिंग ठरु शकेल.

'आरआरआर'च्या यशानंतर ज्यू. एनटीआरची स्टार पॉवर वाढली आहे आणि देवरा साठी सुरुवातीची कमाईची संख्या केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याचा वाढता प्रभाव दर्शवत आहे. चित्रपटाच्या भोवती तयार झालेल्या वलयामुळे व सुरू असलेल्या चर्चेमुळे 'देवरा: भाग 1' बॉक्स ऑफिसवर मोठ्या पदार्पणासाठी तयार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा -

  1. 'देवरा -1' च्या पहिल्या दिवशी पहिल्या शोला एसएस राजामौली आणि अनिरुद्ध रविचंदरची हजेरी, व्हिडिओ व्हायरल - Devara first day first show
  2. 'देवरा: पार्ट 1'च्या रिलीजच्या जल्लोषात ज्युनियर एनटीआरच्या कट-आउटला लागली आग, देवदूतानं दाखवला समजदारपणा - Devara Part 1
  3. 'देवरा पार्ट 1'चं रिलीज सेलिब्रेशन झालं भव्य, प्रेक्षकांनी दिली चित्रपटाला पसंती - jr ntr movie

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.