मुंबई - Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. यावर्षी ती तिच्या चाहत्यांना खुशखबर देणार आहे. दरम्यान, मेट गाला 2024 देखील सुरू आहे, मात्र मेट गालाला जाण्याऐवजी, दीपिका पती रणवीर सिंगबरोबर चांगला वेळ घालवण्यासाठी बाहेर गेली आहे. रणवीर सिंगनं वडील होण्यापूर्वीच सोशल मीडियावरून त्याच्या लग्नामधील सर्व फोटो डिलीट केले होते. यानंतर रणवीर हा प्रसिद्धीझोतात आला होता. आता दीपिकानं सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाच्या 'पिकू' चित्रपटाला आज 8 मे रोजी 9 वर्षे पूर्ण झाले आहेत. या विशेष प्रसंगी तिनं 'पिकू'च्या सेटवरचा एक पोस्ट शेअर लिहिलं, "मला लोकांना सांगायला आवडते की मी किती खाते."
दीपिका पदुकोण शेअर केली पोस्ट : या फोटोमध्ये तिच्याबरोबर अभिनेता अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेता इरफान खान देखील दिसत आहेत. फोटोत बिग बी, इरफान खान आणि दीपिका आपापल्या भूमिकेत खुर्चीवर बसले आहेत. सुजित सरकार दिग्दर्शित 'पिकू' हा चित्रपट अनेकांना आवडला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 8 मे 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची संपूर्ण कहाणी अमिताभ बच्चन, इरफान खान आणि दीपिका पदुकोण यांच्याभोवती फिरणारी होती. आता दीपिकानं शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. हा फोटो पाहून अनेकांना इरफान खानची आठवण झाली आहेत. या फोटोवर चाहते इरफान आणि चित्रपटाबद्दल कौतुक करत आहेत.
दीपिका कधी होणार आई? : दीपिकानं फेब्रुवारी 2024 मध्ये सोशल मीडियावर प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. सप्टेंबर 2024 मध्ये हे जोडपे पालक होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. आता चाहते सप्टेंबरची वाट पाहत आहेत. अनेकांना दीपिकाच्या बाळाला पाहण्याची इच्छा आहे. दरम्यान दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'फायटर' या चित्रपटामध्ये हृतिक रोशनबरोबर दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. आता पुढं ती 'सिंघम अगेन' या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि करीना कपूर खानबरोबर दिसणार आहे. या चित्रपटातचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलंय. याशिवाय पुढं ती 'कल्की 2898 - एडी' चित्रपटामध्ये साऊथ स्टार प्रभासबरोबर दिसणार आहे.
हेही वाचा :
- प्रेग्नेंसी फेजमध्ये दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगबरोबर विमानतळावर झाली स्पॉट, फोटो व्हायरल - Ranveer Singh and Deepika Padukone
- "मराठी लोकांबद्ल भेदभावानं वागणं चिंताजनक" : मंगेश देसाईंची रोखठोक प्रतिक्रिया - Ghatkopar Marathi case
- श्वेता तिवारीनं तिच्या थायलंडच्या सुट्टीतील हॉट फोटो केले इन्स्टाग्रामवर शेअर - shweta tiwari share hot pictures