मुंबई - Deepika Padukone BAFTA 2024: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा इंटरनॅशनल अवॉर्ड्सच्या मंचावर दिसली. ऑस्करमध्ये पदार्पण केल्यानंतर, दीपिका पदुकोणनं बाफ्टा (ब्रिटिश अकादमी चित्रपट आणि टीव्ही पुरस्कार 2024)मध्ये सहभागी झाली. दीपिका बाफ्टा डेब्यूमुळे सध्या चर्चेत आहे. दरम्यान तिचे 77 व्या बाफ्टा अवॉर्ड्समधील एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगानं पसरत आहेत. तिला या फोटोवर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दीपिका हॉलिवूड स्टार ब्रॅडली कूपर आणि किलियन मर्फीबरोबर दिसत आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दीपिकाची खरोखरच या दोन स्टार्सबरोबर भेट झाली का ? असा प्रश्न अनेकजण विचारताना दिसत आहे.
दीपिका पदुकोण हॉलिवूड स्टार्सबरोबर झाली स्पॉट : ब्रॅडली कूपरला 'माइस्ट्रो' (2023) या चित्रपटातून तर किलियन मर्फीला 'ओपेनहाइमर'मधून ओळख मिळाली आहे. दरम्यान दीपिका पदुकोणनं याआधी ब्रॅडली कूपरच्या 'माइस्ट्रो'मधील भूमिकेचे कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये दीपिका ब्रॅडली आणि मर्फीबरोबर दिसल्यानंतर तिचा एक फोटो सोशल मीडियावर समोर येऊ लागला. आता यानंतर अनेकांचा असा विश्वास आहे की, दीपिका हॉलिवूडमध्येही जाणार आहे. दरम्यान खरचं दीपिका या स्टार्सना प्रत्यक्षात भेटले आहे की नाही याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फोटोचं सत्य काय आहे? : दीपिकाचा किलियन मर्फी आणि ब्रॅडली कूपरबरोबरचा व्हायरल होत असलेला हा फोटो एडिट करण्यात आला आहे. एका चाहत्यानं तिचा हा फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आपण फोटोत पाहू शकतो की, तिन्ही स्टार्सची उंची सारखीच आहे, जे हे दर्शविते की फोटो एडिट केला गेला आहे. 'ओपेनहाइमर'नं बाफ्टा 2024 मध्ये 7 पुरस्कार जिंकले आहेत. 18 फेब्रुवारी रोजी लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात दीपिका पदुकोणनं भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केलेली बेज रंगाची साडी परिधान केली होती. दरम्यान दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती यावर्षी नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी हे कलाकार असणार आहेत.
हेही वाचा :