ETV Bharat / entertainment

दिलजीत दोसांझच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये अचानक अवतरली दीपिका पदुकोण, पाहा मग पुढं काय घडलं - DILJIT DOSANJH BENGALURU CONCERT

आई बनल्यानंतर 2 महिन्यांनी दीपिका पदुकोण पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली. गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये हजर राहून तिनं चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

Deepika Padukone
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पदुकोण (ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 7, 2024, 12:58 PM IST

Updated : Dec 7, 2024, 2:14 PM IST

मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणनं 8 सप्टेंबर रोजी तिच्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. रणवीर सिंग आणि दीपिका या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झालं. दीपिकानं आपल्या मुलीचं नाव 'दुआ' ठेवलं असून ती आता 2 महिन्यांची आहे. दीपिका आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली. पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये दीपिका पदुकोण अचानक अवतरली आणि तिनं आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. आई झाल्यानंतर दीपिका पदुकोण तिच्या चाहत्यांमध्ये पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. बेंगळुरू हे दीपिका पदुकोणचं मूळ गाव आहे. दीपिका पदुकोण आणि दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या इव्हेन्टमध्ये दीपिका पदुकोण कूल कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. दीपिका पदुकोणनं पांढऱ्या टी-शर्टवर निळ्या रंगाचा डेनिम परिधान केला होता. दिलजीत दोसांझच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. साऊथ इंडियामध्येही तो किती लोकप्रिय आहे याचा प्रत्यय यामुळं आला. बंगळुरूमध्ये दीपिका पदुकोणही खूप लोकप्रिय आहे. दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये ती पोहोचेल, अशी कल्पनाही तिच्या चाहत्यांनी केली नव्हती.

दीपिका पदुकोण जेव्हा अचानक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दाखल झाली तेव्हा तिच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. यामध्ये दीपिका पदुकोणनं स्टेजवर दिलजीत दोसांझला कन्नड भाषा शिकवली. दिलजीत दोसांझचा संगीत कॉन्सर्ट "दिल-लुमिनाटी टूर" 6 डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये धमाल रंगला.

दीपिका आणि दिलजीत दोसांझचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर त्यांचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दीपिका पदुकोणच्या एका चाहत्यानं लिहिलं आहे की, 'माझ्या तिकिटाचे पैसे वसूल झाले आहेत, एक से एक धमाका फ्री.' तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलंय की, 'दिलजीतचा आतापर्यंतचा सर्वात मजेदार कॉन्सर्ट.'

दिलजीत दोसांझचा 'दिल लुमिनाटी टूर' सध्या भारतातील वेगवेगळ्या शहरात सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या देशातील प्रमुख शहरातील शोमध्ये हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक हजर राहिले होते. त्याच्या प्रत्येक गाण्यावर लोक ताल धरुन नाचत एन्जॉय करत असतात. आता त्याचे पुढील कॉन्सर्ट मुंबई, कोलकाता, इंदूर, पुणे आणि गुवाहाटी येथे होणार आहेत.

Last Updated : Dec 7, 2024, 2:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.