ETV Bharat / entertainment

'बाफ्टा अवॉर्ड्स 2024' मध्ये दीपिका पदुकोणने उपस्थितांवर घातली मोहिनी - दीपिका पदुकोण

BAFTA Awards 2024 : 'बाफ्टा अवॉर्ड्स 2024' च्या रेड कार्पेटवर चमकत्या साडीत दीपिका पदुकोण अवतरली होती. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात ती प्रेझेन्टर म्हणून ग्लोबल सेलेब्रिटींसह हजर होती.

Deepika Padukone
बाफ्टा अवॉर्ड्स 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 9:55 AM IST

मुंबई - BAFTA Awards 2024 : लंडन ( यूके ) - लंडनच्या रॉयल फेस्टिव्ह हॉलमध्ये 19 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या 'बाफ्टा अवॉर्ड्स 2024' च्या रेड कार्पेटवर अभिनेत्री दीपिका पदुकोणने उपस्थितांवर मोहिनी घातली. यावेळी दीपिकाने सोनेरी आणि चांदीच्या छटा असलेली चमकदार साडी परिधान केली होती, ज्याच्यावर सर्वत्र सिक्वीन्स वर्क होते. तिने ते स्ट्रॅपी स्लीव्हजसह मॅचिंग ब्लाउजची निवड केली होती. केसांचा अंबाडा आणि स्टेटमेंट इअररिंग्स तिच्या लुकमध्ये नक्कीच भर घालत होती.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण

अभिनेत्री दीपिका पदुकोणने प्रतिष्ठित बाफ्टा अवॉर्ड्स (ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) सोहळ्यात बॉलिवूड ग्लॅमरचा जलवा दाखवला. इंस्टाग्राम स्टोरीजवर दीपिकाने तिच्या लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. गोल्यावर्षी ऑस्कर सोहळ्यात भारताचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर यंदाच्या बाफ्टामध्ये तिला जगातील महत्त्वांच्या सेलेब्रिटींसोबत प्रेझेन्टर म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. बाफ्टा पुरस्कार प्रेझेन्टर म्हणून निवड झाल्याबद्दल दीपिकाने नुकतेच कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Deepika Padukone
'बाफ्टा अवॉर्ड्स 2024' मध्ये दीपिका पदुकोण

'बाफ्टा अवॉर्ड्स 2024' च्या या यादीत इंग्लंडचा माजी फुटबॉल स्टार डेव्हिड बेकहॅम, गायिका दुआ लिपा, केट ब्लँचेट, 'ब्रिजर्टन' एफएमईच्या अ‍ॅडजोआ एंडोह, 'वोंका' ओम्पा लूम्पा ह्यू ग्रांट आणि 'एमिली इन पॅरिस'ची 'लिली कॉलिन्स' यांचाही समावेश होता.

इन्स्टाग्रामवर दीपिकाने अलीकडेच तिच्या स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली ज्याला तिने "कृतज्ञता" असे कॅप्शन दिले आहे. 77 वा BAFTA चित्रपट पुरस्कार सोहळा आज लंडनच्या रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये दिमाखात साजरा झाला. रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सलग दुसऱ्या वर्षी हा सोहळा रंगला होता. भारतात, हा पुरस्कार सोहळा लायन्सगेट प्लेवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.

उपस्थितांमध्ये 'सॉल्टबर्न' स्टार बॅरी केओघन, 'मेस्ट्रो' अभिनेते ब्रॅडली कूपर आणि कॅरी मुलिगन, 'ओपेनहाइमर' लीड सिलियन मर्फी आणि दिग्दर्शक ग्रेटा गेर्विग, क्रिस्टोफर नोलन, सेलीन सॉन्ग आणि योर्गोस लॅन्थिमोस यांचा समावेश होता.

चित्रपटाच्या आघाडीवर, दीपिका अलीकडेच हृतिक रोशनसह 'फायटर' या चित्रपटात दिसली होती. या एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात तिच्यासह चित्रपटात अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांनीही प्रमुख भूमिका केल्या होत्या. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. दाक्षिणात्य अभिनेता प्रभाससोबत 'कल्की 2898 एडी' या साय-फाय अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे आणि 9 मे 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

हेही वाचा -

  1. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' टायटल ट्रॅकचा टीझर रिलीज
  2. संजय कपूरची मुलगी शनाया कपूर चर्चेत, कारण काय?
  3. आलिया भट्टनं ब्लॅक वेल्वेट साडीत केलं चाहत्यांना घायाळ, 'पोचर' लंडन स्क्रीनिंगमधील फॅशन चर्चेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.