ETV Bharat / entertainment

क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचं केलं कौतुक - chandu champion - CHANDU CHAMPION

Kartik Aaryan and Chandu Champion : कार्तिक आर्यन अभिनीत 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट अनेकांना आवडत आहे. या चित्रपटात कार्तिकनं सुंदर अभिनय केला आहे. आता त्याचं कौतुक भारताचा धडाकोबाज माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं केलं आहे.

Kartik Aaryan and  Chandu Champion
कार्तिक आर्यन आणि चंदू चॅम्पियन (चंदू चॅम्पियन- कार्तिक आर्यन (Etv Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 10:56 AM IST

मुंबई - Kartik Aaryan and Chandu Champion : कबीर खान दिग्दर्शित कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये सरासरी व्यवसाय करत आहे. दरम्यान, कार्तिकला त्याच्या अभिनयाची चांगलीच वाहवा मिळत आहे. अलीकडेच भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं कार्तिकच्या अभिनयाचे आणि चित्रपटाचं कौतुक केलं आहे. एका मुलाखतीत सेहवागनं चित्रपटाबाबत आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यानं सांगितलं की, तो या चित्रपटामुळे खूप प्रभावित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तो भावूक झाला, असं बोलत असताना त्यानं काही मनोरंजक गोष्टी देखील शेअर केल्या.

कार्तिक आर्यनचं क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं केलं कौतुक : मुरलीकांत पेटकर यांच्यासाठी सुवर्णपदक जिंकणं किती अवघड होतं, याची जाणीव सेहवाग झाली. त्यानं पुढं म्हटलं, "मी काल एक चित्रपट पाहिला, त्याचं नाव 'चंदू चॅम्पियन' होतं. आपल्या पॅरालिम्पिक खेळाडूंना किती त्रास सहन करावा लागला हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलंं आहे." यादरम्यान, मुलाखत घेणारे होस्ट गौरव कपूर यांनीही क्रीडा व्यक्तिमत्त्वांच्या कहाणी देखील जाणून घेतल्या पाहिजेत,असा सल्ला सर्वांना दिला. याशिवाय काही सेलिब्रिटींनी देखील कार्तिकच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

'चंदू चॅम्पियन' चित्रपटाबद्दल : याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं देखील कार्तिकचं कौतुक करत एक पोस्ट शेअर केली होती. आता कार्तिकचा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची कहाणी मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी कार्तिकनं खूप मेहनत घेतली आहे. त्यानं या चित्रपटासाठी जिममध्ये घाम गाळून वजन कमी आणि जास्त केलं होतं. तसेच त्यानं या चित्रपटासाठी साखर खाण्याचं देखील टाळलं होतं. 'चंदू चॅम्पियन'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. कार्तिक आर्यननं या चित्रपटात पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. 'चंदू चॅम्पियन'मध्ये त्याच्याबरोबर विजय राज, भुवन अरोरा,यशपाल शर्मा, अनिरुद्ध दवे, राजपाल यादव, श्रेयस तळपदे, सोनाली कुलकर्णी आणि इतर अनेक कलाकार आहेत.

हेही वाचा :

  1. 'इंडियन 2' मधून परतलेल्या सेनापतीचं नेटिझन्सकडून जोरदार स्वागत, ट्रेलरनं देशभर निर्माण केली हवा - Indian 2 Trailer
  2. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना 'व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर'साठी येणार एकत्र - VAMPIRES OF VIJAY NAGAR
  3. 'स्त्री 2' टीझरमध्ये श्रद्धा कपूरची धमाकेदार एन्ट्री... राजकुमार, अपारशक्तीसह पंकज त्रिपाठीची उडाली तारांबळ - Stree 2 Teaser

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.