मुंबई - Crew X Review: तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन अभिनीत 'क्रू' चित्रपट आज स्क्रीनवर झळकला. महिला कलाकार मुख्य भूमिकेत असलेला अखेरचा चित्रपट यापूर्वी थिएटरमध्ये हिट झाला होता हे आठवणे कठीण आहे. या प्रकारातील चित्रपट म्हणजे 'वीरे दी वेडिंग' हा एकता कपूर आणि रिया कपूर यांचा कॉमेडी चित्रपट 2028 मध्ये प्रदर्शित झाला होता. जवळजवळ सहा वर्षांनंतर, याच चित्रपटाचे निर्माते महिलांच्या मुख्य भूमिकेसह आणखी एका विचित्र मनोरंजनासह प्रेक्षकांना आनंदित करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
16 मार्च रोजी ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 'क्रू' बद्दलची अपेक्षा वाढली. 'लूटकेस' आणि TVF 'ट्रिपलिंग' या चित्रपटासाठी ओळखला जाणाऱ्या चित्रपटाचा दिग्दर्शक राजेश ए कृष्णनच्या 'क्रू'ला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'क्रू' चित्रपटाचा पहिल्या दिवशी पहिला शो पाहिल्यानंतर X वर नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
स्क्रिनिंगनंतर, नेटिझन्सनी या चित्रपटावर त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी X वर प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. चित्रपटाची निर्विवाद ऊर्जा, त्यातील प्रमुख महिलांच्या करामती आणि प्रसंगिक विनोदांची रेलचेल आणि कथेच्या नव्या विषयानं प्रेक्षकांची मने जिंकल्याचं दिसते.
118 मिनिटांच्या त्रू चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून UA प्रमाणपत्र मिळाले आहे. सर्व वयोगटाच्या मुलांना पाहाता येऊ शकेल अशा एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स आणि रिया कपूरच्या फिल्म अँड कम्युनिकेशन्स नेटवर्कने निर्मिती केलेला 'क्रू' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
X वरील युजर्स 'क्रू' एक परिपूर्ण जॉयराइड असल्याचं सांगत कौतुक करत आहेत. यातील नवीन संकल्पनेची आणि मजेदार वन-लाइनर्सची प्रशंसा करत आहेत. तब्बू, करीना आणि क्रिती यांच्या अभिनयामुळे चित्रपटाने आणखी एक उंची गाठली आहे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे, खिळवून ठेवणारे आणि पूर्ण मनोरंजन करणारे स्मार्ट आणि चपखल कथन तयार केल्याबद्दल राजेश कृष्णन यांच्या दिग्दर्शनाचे देखील नेटिझन्स कौतुक करत आहेत.
तब्बू, करीना आणि क्रिती यांच्या भूमिकांसह इतरही कलाकारांनी यात चांगले योगदान दिले आहे. दिलजीत दोसांझ, कपिल शर्मा, राजेश शर्मा आणि तृप्ती खामकर यांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
क्रूवर आपले मत शेअर करताना एक म्हणतो,, "क्रू हा एक मजेदार विलक्षण चित्रपट! ही एक अविश्वसनीय राइड आहे, मूळ कल्पना, मनोरंजक कथानक, आनंदी वन-लाइनर्स आणि एक अप्रतिम साउंडट्रॅक आहे. तब्बू, करीना आणि क्रिती या त्रिकुटाची केमिस्ट्री आणि टायमिंग उत्कृष्ट आहे. दिग्दर्शक राजेश कृष्णन यानं एक सहज-सुंदर आणि हलक्या-फुलक्या मजेशीर चित्रपटाचे पैसा वसूल दिग्दर्शन केलंय. आपल्या क्रू बरोबर जा आणि या मजेदार राइडचा आनंद घ्या."
आणखी एक युर म्हणतो, "क्रू हे आनंदी, आकर्षक, मजेदार चित्रपट आहे. तब्बू, करीना आणि क्रिती यांची कामगिरी मनोरंजक आहे. एकूणच क्रू नक्कीच तुमचे मनोरंजन करेल."
अशाच भावनांची एक प्रतिक्रिया युजरने देताना लिहिलंय, "मनोरंजक! विनोदी, उत्कृष्ट संवाद आणि तब्बू आणि विनोदाचे पॅकेज. मजबूत पकड आणि गुंतवून ठेवणाऱ्या परफॉर्मन्ससह हास्याने भरलेला प्रवास. मनोरंजन शिखरावर आहे! क्रू टर्बो चार्ज आहे. तब्बू, करीना आणि क्रिती या कलाकारांचं उत्कृष्ट त्रिकूट. जरूर पहा."
एक परिपूर्ण मनोरंजन म्हणून आणखी एक युजरने कमेंट केली, "हा एक फ्रेश, चांगली कथा आणि अप्रतिम संवादांसह आनंददायक आहे. जा आणि आपल्या कुटुंबासह पहा."
हेही वाचा -