ETV Bharat / entertainment

'चंदू चॅम्पियन'चे ग्वाल्हेरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात स्वागत, कार्तिक आर्यनच्या गावात होणार ट्रेलर लॉन्च - Chandu Champion and Kartik Aaryan - CHANDU CHAMPION AND KARTIK AARYAN

Kartik Aaryan in Gwalior: 'चंदू चॅम्पियन' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या मूळ गावी ग्वाल्हेरला पोहोचला आहे. त्याचं विमानतळावर ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं.

Kartik Aaryan in Gwalior
कार्तिक आर्यन ग्वाल्हेरमध्ये (कार्तिक आर्यन(Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 5:38 PM IST

मुंबई - Kartik Aaryan in Gwalior: बॉलिवूडचा सुंदर अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी, तो त्याच्या मूळ गावी ग्वाल्हेरला पोहोचला आहे. याठिकाणी त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. ग्वाल्हेरमधील कार्तिकचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत तो ग्वाल्हेर विमानतळावर उतरल्यानंतर ढोल वाजवून त्याचं स्वागत केल्याचं दिसतं. यावेळी त्याला अनेकांनी घेरलं होत. कार्तिक त्याच्या आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'चे प्रमोशन देखील यावेळी करणार आहे.

'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर लॉन्च ग्वाल्हेर शहरात : 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटासाठी कार्तिकनं खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी त्यानं वजन कमी केलं होतं. याशिवाय त्यानं वर्षभर साखर खाण्याचं देखील टाळलं होतं. दरम्यान, एका व्हायरल व्हिडिओमध्ये कार्तिक हा खूप खुश असल्याचं दिसत आहे. कार्तिकबरोबर त्याचे वडील आणि 'चंदू चॅम्पियन'चे दिग्दर्शक कबीर खानही होते. दरम्यान कबीर खाननं खुलासा केला की, "कार्तिकनं 'स्टिरॉइड्सशिवाय' चित्रपटासाठी 18 किलो वजन कमी केलं होतं. यानंतर मी त्याला भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यानं दुसऱ्या एका भूमिकेसाठी वजन वाढवलं ​होतं. यानंतर मी त्याला सांगितलं की, तुला आंतरराष्ट्रीय खेळाडूची भूमिका साकारायची आहे." प्रत्युत्तरात तो फक्त हसला आणि म्हणाला, "मी करेन सर."

'चंदू चॅम्पियन' चित्रपटाबद्दल : कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपटगृहांमध्ये 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये कार्तिक व्यतिरिक्त श्रद्धा कपूर, कतरिना कैफ भुवन अरोरा, पलक लालवानी, राजपाल यादव, विजय राज, मनोज आनंद आणि इतर स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. याआधी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामधील काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते. हे पोस्टर्स चाहत्यांना खूप आवडले होते. दरम्यान कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तो 'आशिकी 3' आणि 'भूल भुलैया 3'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामच्या मृत्यूनंतर कथित बॉयफ्रेंड चंद्रकांत उर्फ चंदूनं केली आत्महत्या - CHANDU DIES BY SUICIDE
  2. सशस्त्र रक्षकांसह सलमान खानची एअरपोर्टवर एन्ट्री, जॅकलिन फर्नांडिस कान्सला रवाना - Salman Khan
  3. 'बेपत्ता' झालेला 'तारक मेहता..' फेम गुरुचरण सिंग सापडला, कुटुंबीयांसह प्रेक्षकांचा जीव भांड्यात पडला - Taarak Mehta Fame Gurucharan Singh

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.