ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यननं 'चंदू चैंपियन'मधील ट्रेलर डबिंगची झलक केली शेअर - Chandu Champion - CHANDU CHAMPION

Chandu Champion Trailer Dubbing : कार्तिक आर्यननं 'चंदू चैंपियन' चित्रपटाची ट्रेलर डबिंगची एक झलक शेअर केली आहे. आता अनेकजण त्याच्या चित्रपटाची वाट पाहात आहेत.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन ((Photo- @kartikaaryan Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 11:22 AM IST

मुंबई - Chandu Champion Trailer Dubbing : साजिद नाडियादवाला आणि कबीर खान निर्मित 'चंदू चॅम्पियन' या आगामी स्पोर्ट्स ड्रामाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. अभिनेता कार्तिक आर्यननं नुकतेच त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचे डबिंग पूर्ण केलं आहे. आता त्यानं डबिंग स्टुडिओची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. गेल्या शनिवारी अधिकृत इंस्टाग्रामवर त्यानं डबिंग स्टुडिओमधील फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, "थोडी प्रतीक्षा करावी लागेल. चंदू त्याच्या वाटेवर आहे. ट्रेलर डब. चंदू चॅम्पियन 14 जून रोजी थिएटरमध्ये येणार आहे." आता त्याच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून त्याच्या चित्रपटाबद्दल उत्सुक असल्याचं सांगत आहे.

कार्तिक आर्यननं घेतली फुटबॉल पट्टूची भेट : कार्तिक आर्यन नुकताच बुंडेस्लिगा फुटबॉल सामन्यासाठी रवाना झाला आहे. यावेळी त्याची भेट फुटबॉलपट्टू हॅरी केनशी झाली, जो बुंडेस्लिगा क्लब बायर्न म्युनिकसाठी स्ट्रायकर म्हणून खेळतो. हॅरी केननं एक जर्सीवर ऑटोग्राफ केला. ती जर्सी त्यानं कार्तिकला भेट दिली. कार्तिकनं हॅरीला त्याच्या आगामी चित्रपटातील एक डायलॉगही शिकवला. हा डायलॉग असा आहे, 'चंदू चॅम्पियन नाही, मी चॅम्पियन आहे.' 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी कार्तिकला शारीरिकरित्या बळकट होण्यासाठी कठोर प्रशिक्षण घ्यावं लागले होते. या चित्रपटात त्याच्याबरोबर श्रद्धा कपूर आणि कतरिना कैफ या अभिनेत्री दिसणार आहेत. हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

कार्तिक आर्यनचे आगामी चित्रपट : 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट प्रसिद्ध भारतीय ॲथलीट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. 1970 च्या कॉमनवेल्थ गेम्स आणि 1972 च्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून त्यांनी एक इतिहास रचला होता. हे पदक जिंकल्यामुळे त्यांनी जगात भारताचे नाव हे आघाडीवर नेले होते. 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केलंय. या चित्रपटाची निर्मिती नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत केली जात आहे. दरम्यान कार्तिकच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'भूल भुलैया 3' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर विद्या बालन, तृप्ती दिमरी आणि माधुरी दीक्षित दिसणार आहे. याशिवाय तो 'आशिकी 3'मध्ये देखील झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चित्रपटाचं शूटिंग सुरू - Sunny Sanskari Ki Tulsi Kumari
  2. रणबीर-आलिया प्रिय मुलगी राहाबरोबर झाले स्पॉट, राहाच्या हसण्याची चाहत्यांना भुरळ - Ranbir Alia spotted with Raha
  3. आलिया भट्टचा शॉर्ट्समधील व्हिडिओ झाला व्हायरल, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया - Alia Bhatt Summer Outfit

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.