मुंबई - पूनम पांडेने आपले सर्व्हायवल कॅन्सरने निधन झाल्याचं सोशल मीडियावर जाहीर करुन प्रसिद्धीचा स्टंट केल्याने वाद निर्माण झाला आहे. तिच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी असंख्य सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर निर्णयाबाबत सडकून टीका केली. मात्र, या सर्व उलटसुलट प्रतिक्रियांदरम्यान, चित्रपट निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्माने पूनमला पाठिंबा दिला आहे.
पूनमच्या मृत्यूच्या घोषणेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एका व्हिडिओमध्ये, तिने स्वतःच्या खोट्या मृत्यूच्या बातमीकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आणि त्याबद्दल अभिमान व्यक्त केला. सर्व्हायवल कॅन्सरबाबत जनजागृती व्हावी यासाठी आपण हा उद्योग केल्याचं सांगत तिने या प्रकरणाचे समर्थन केले होते. असे असले तरी तिच्या फिल्म इंडस्ट्रीतील काही सहकाऱ्यांनी तिला पाठीशी घातलं आहे.
पूनमने तिच्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "मी जिवंत आहे. मी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला बळी पडले नव्हते. पण दुर्दैवाने, या आजाराने आपला जीव गमावलेल्या असंख्य महिलांसाठी असेच म्हणता येणार नाही."
पूनमच्या माजी सहकारी, डिझायनर साईशा शिंदे हिने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. परिस्थितीच्या गंभीरतेवर तिने जोर दिला आणि पूनमचा प्रसिद्धी स्टंट मान्य नसल्याचे म्हटले आहे. प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सर्व्हायव्हल कॅन्सरच्या जागृतीसाठी केलेल्या प्रयत्नाची प्रशंसा करुन तिचा हेतू योग्य असल्याचे म्हटले आहे.
श्रीजीता डे यांनी अनेकांच्या भावनांचा प्रतिध्वनी करत, पूनमच्या या वागण्याचा निषेध केला. कॅन्सरचे गांभीर्य आणि लक्ष वेधून घेण्याच्या असंवेदनशीलतेवर त्यांनी भर दिला. गायक राहुल वैद्यने पूनमच्या स्टंटचे घृणास्पद स्वरूप अधोरेखित करून खळबळजनकतेच्या पार्श्वभूमीवर अस्सल मार्केटिंग धोरणांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
अभिनेता रिद्धी डोगरा हिने पूनम हिच्या फेक न्यूजच्या पार्श्वभूमीची कोणतीही पडताळणी न करता प्रसिद्धीसाठी चढाओढ करणाऱ्या प्रसारमाध्यमांना जबाबदार धरले. तर सिद्धांत कपूरनेही पूनमच्या या वागण्यावर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा -