ETV Bharat / entertainment

कमल हासन स्टारर 'इंडियन 2'नं बॉक्स ऑफिस केली धमाकेदार कमाई - INDIAN 2 BOX OFFICE COLLECTION - INDIAN 2 BOX OFFICE COLLECTION

Indian 2 box office collection day 1 : कमल हासन स्टारर 'इंडियन 2'नं बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्या दिवशी जोरदार कमाई केली आहे. आता सर्वांनाच्या नजरा शनिवार आणि रविवारच्या कमाईवर लागल्या आहेत.

Indian 2 box office collection day 1
इंडियन 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1 ((कमल हासन (IMAGE- IANS)))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 12:22 PM IST

मुंबई - Indian 2 box office collection day 1 : अभिनेता कमल हासन त्यांच्या 'इंडियन 2' चित्रपटामुळे चर्तेत आहे. बॉलिवूडमध्येही त्यांनी केलेल्या कामातील भूमिकांबद्दल त्यांचे नेहमीच कौतुक झाले आहे. अलीकडेच त्यांचा 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई केली आहे. आता त्यांचा 'इंडियन 2' थिएटर्समध्ये दाखल झाला आहे. आता या चित्रपटाचं ओपनिंग कलेक्शन समोर आलंय. 'इंडियन 2'च्या दमदार कहाणीनं आता प्रेक्षकांवर किती जादू चालवली याबद्दल, आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'इंडियन 2'नं दिली 'या' चित्रपटाला टक्कर : मोठ्या पडद्यावर शुक्रवारी 12 जुलै रोजी 'इंडियन 2'नं अक्षय कुमार स्टारर 'सरफिरा'ला टक्कर दिली. सध्या दोन्ही चित्रपट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. सर्वांच्या नजरा या दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनकडे लागल्या आहेत. दरम्यान 'इंडियन 2'मध्ये कमल हासन कमांडरच्या भूमिकेत आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोकांची टीम इंडियनला परत आणण्याची मोहीम राबवते. इथूनचं या चित्रपटाच्या कहाणीला वेगळे वळण मिळते. रिलीजपूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. 'इंडियन 2' चित्रपटामध्ये कमल हासन व्यतिरिक्त रकुल प्रीत सिंग, प्रिया भवानी शंकर, नेदुमुदी वेणु, ब्रह्मानंदम, काजल अग्रवाल, सिद्धार्थ नारायण, वेन्नेला किशोर, गुलशन ग्रोवर, योगी बाबू आणि इतर कलाकार दिसले आहेत.

'इंडियन 2'नं बॉक्स रिलीजच्या पहिल्या दिवशी केली धमाकेदार कमाई : 'इंडियन 2'नं बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग दिली आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 25.6 कोटीची कमाई केली. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियन' चित्रपटाच्या सीक्वेलची सर्वाधिक कमाई तामिळ भाषेत झाली आहे. इथून या चित्रपटानं 17 कोटींचा व्यवसाय केला आहे. दरम्यान 'इंडियन' हा चित्रपट 1996मध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. 'इंडियन' आणि 'इंडियन 2'चं दिग्दर्शन एस. शंकर यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. कमल हासन स्टारर 'इंडियन 2'चा पहिल्या दिवशी पहिला शो पाहून चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया... - Indian 2
  2. 'इंडियन 3'चा ट्रेलर 'इंडियन 2'च्या शेवटी होणार रिलीज, दिग्दर्शक एस. शंकर यांनी केला खुलासा - INDIAN 3 TRAILER
  3. 'इंडियन 2' च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'ची संथ सुरुवात - Kamal Haasan vs Akshay Kumar

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.