मुंबई - Trailer and teaser : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक चांगल्या चित्रपटांचे टीझर आणि ट्रेलर रिलीज झाले आहेत. वरुण धवनच्या ॲक्शनपट 'बेबी जॉन'चा फर्स्ट लूकही नुकताच रिलीज झाला आहे. यामी गौतमच्या आगामी चित्रपट 'आर्टिकल 370'चा ट्रेलरही याच आठवड्यात रिलीज झाला आहे. आता या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे टीझर आणि ट्रेलरबद्दल जाणून घेऊया.
- बेबी जॉन : वरुण धवनचा 'बेबी जॉन' या चित्रपटाचा टीझर या आठवड्यात रिलीज झाला आहे. या चित्रपटात वरुण ॲक्शन अवतारात दिसणार आहे. 'बेबी जॉन' चित्रपटात त्याच्यासोबत वामिका गब्बी आणि साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश आहेत. दिग्दर्शक ए कालीश्वरन यांनी बनवलेला हा चित्रपट 31 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
- बस्तर: द नक्सली स्टोरी चित्रपट : 'बस्तर: द नक्सली स्टोरी' या चित्रपटासाठी विपुल अमृतलाल शाह यांनी केरळ स्टोरी, सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा यांच्या टीमसोबत पुन्हा भागीदारी केली आहे. या आठवड्यात चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अदा शर्माचा हा आगामी चित्रपट 15 मार्च 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
- कुछ खट्टा हो जाए चित्रपट : प्रसिद्ध गायक गुरु रंधावा हा 'कुछ खट्टा हो जाए' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. 'कुछ खट्टा हो जाए' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात गुरू एका प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहे. गुरु रंधावासोबत या चित्रपटात सई एम मांजरेकर रोमान्स करताना दिसेल. हा चित्रपट 16 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
- आर्टिकल 370 : जियो स्टूडियोजनं बी62 स्टूडियोजच्या सहकार्यानं या आठवड्यात 'आर्टिकल 370'चा ॲक्शन-पॅक ट्रेलर रिलीज केला आहे. 23 फेब्रुवारी 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
- लव्ह स्टोरियां : अॅमेझॉन प्राईमवर 'लव्ह स्टोरियां'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये सहा लव्ह स्टोरी दाखविण्यात येणार आहे. धर्मा एंटरटेनमेंट द्वारे निर्मित या चित्रपटाचे निर्माते करण जोहर आणि अपूर्व मेहता आहेत. 'लव्ह स्टोरियां'चा प्रीमियर व्हॅलेंटाईन डे, 14 फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओवर होईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
क्रैक-जीतेगा तो जिएगा : अभिनेता विद्युत जामवाल स्टारर 'क्रैक-जीतेगा तो जिएगा' या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. काहीतरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दोन भावांची कहाणी या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा :