मुंबई - Lok Sabha elections 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीबाबत चित्रपटसृष्टीत चांगलाच गोंधळ उडाला होता. यावेळी हेमा मालिनी मथुरामधून, शत्रुघ्न सिन्हा असनसोलमधून, मनोज तिवारी ईशान्य दिल्लीतून, रवी किशन गोरखपूरमधून, स्मृती इराणी अमेठीमधून, राज बब्बर गुरुग्राममधून, कंगना रनौत मंडीमधून तर अरुण गोविल मेरठमधून उमेदवार आहेत. लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. आता हे सेलिब्रिटी निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. हे सेलिब्रिटी वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून आता अनेकांच्या नजरा निकालाकडे खिळल्या आहेत.
उमेदवार पक्ष जागा निकाल
- मनोज तिवारी -भाजप -ईशान्य दिल्ली- पुढे
- रवी किशन -भाजप -गोरखपूर- पुढे
- कंगना राणौत- भाजपा -मंडी -पुढे
- अरुण गोविल- भाजप -मेरठ -मागे
- स्मृती इराणी- भाजपा -अमेठी -मागे
- हेमा मालिनी -भाजप -मथुरा- पुढे
- शत्रुघ्न सिन्हा- टीएमसी -असनसोल ——
- राज बब्बर -काँग्रेस -गुरुग्राम -पुढे
लोकसभा निवडणूक 2024 : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा जागेसाठी कंगना राणौतची स्पर्धा काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांच्याशी आहे. कंगना म्हणते की जर ती निवडणूक जिंकली तर ती बॉलिवूड सोडून फक्त एका जागेवर लक्ष केंद्रित करेल. तसेच सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये मनोज तिवारी आघाडीवर आहेत. ते ईशान्य दिल्लीतून भाजपाचे उमेदवार असून त्यांची टक्कर काँग्रेसच्या कन्हैया कुमारबरोबर आहे. मथुरा मतदारसंघातून हेमा मालिनी या पुढे आहेत. त्या मथुरेतून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. रामायण शोचे राम अरुण गोविल उत्तर प्रदेशातील मेरठमधून पिछाडीवर आहेत. गोरखपूरमधून रवी किशन पहिल्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत. त्यांची स्पर्धा समाजवादी पक्षाच्या काजल निषाद यांच्याशी आहे. राज बब्बर यांनी हरियाणातील गुरुग्राममधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात भाजपाचे राव इंद्रजित सिंग आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालमधील असनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. ते ममता बॅनर्जी यांच्या पक्ष तृणमूल काँग्रेसबरोबर आहेत. याशिवाय स्मृती इराणी भाजपाची उमेदवार असून त्या सध्या पिछाडीवर आहे.
हेही वाचा :