ETV Bharat / entertainment

नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया, जाणून घ्या कोण काय म्हणाले... - Narendra Modi PM Oath - NARENDRA MODI PM OATH

Narendra Modi PM Oath : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राजधानी दिल्लीत झालेल्या या समारंभाला अनेक दिग्गज सेलेब्रिटीही हजर होते. बॉलिवूडमधील अनेकांनी मोदी यांचे अभिनंदन केलं आणि देशाचा विकासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Narendra Modi PM Oath
नरेंद्र मोदी पंतप्रधान शपथ (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 12:28 PM IST

नवी दिल्ली - Narendra Modi PM Oath : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर, बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं सोमवारी पहाटे त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर अभिनंदनाचा संदेश पोस्ट केला आणि लिहिलं, “पंतप्रधान मोदी जी, ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी अभिनंदन."

Narendra Modi PM Oath
सिद्धार्थ मल्होत्रा पोस्ट (Sidharth Malhotra Insta)

अलीकडेच मुलीचा पिता बनलेल्या वरुण धवननंही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली. "श्री नरेंद्र मोदीजी ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि तुमच्या शपथविधी समारंभासाठी अभिनंदन. तुम्ही आमच्या देशाला अधिक उंचीवर घेऊन जाल.", असं त्यानं पोस्टमध्ये लिहिलंय.

राजकुमार रावनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "या ऐतिहासिक सलग तिसऱ्या विजयाबद्दल आमचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली आपला देश अशीच समृद्ध करत राहो. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, सर."

'कंतारा' या गाजलेल्या चित्रपटाचा अभिनेता ऋषभ शेट्टीनं देखील X या सोशल मीडिया हँडलवर पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, "नरेंद्र मोदी यांचे भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन. आम्ही विकास, शिक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा बद्दल तुमच्या समर्पणाची मनापासून कदर करतो ."

मेगास्टार चिरंजीवी यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केलं आणि लिहिलं, "श्री नरेंद्र मोदीजी यांचे तिसऱ्यांदा भारताचे माननीय पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! मी तुम्हाला आणि तुमच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना शक्ती मिळो आणि आपल्या देशाला समृद्धी आणि वैभवाच्या मार्गावर पुढे जात राहो, अशी इच्छा करतो."

अभिनेता विजयनं त्याच्या राजकीय पक्ष, तमिलगा वेत्री कळघमच्या वतीनं पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिलं, "मी नरेंद्र मोदी यांचे भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन करतो."

अभिनेता सुनील शेट्टीनं देखील इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, "माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी अभिनंदन. तुम्ही भारताला अधिक समृद्धी आणि एकात्मतेकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करत असताना तुमच्या नेतृत्वात शक्ती आणि बुद्धी कायम राहो ही शुभेच्छा."

चित्रपट निर्माता करण जोहरनं देखील त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिलं, "आमचे माननीय पंतप्रधान - श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भारत पुढील काही वर्षांसाठी तुमची शक्ती, उत्कटता आणि दूरदृष्टीनं नेतृत्व करण्यास उत्सुक आहे!"

Narendra Modi PM Oath
करण जोहर पोस्ट (Karaj Johar Insta)

राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटी, मंत्री आणि व्यावसायिक मान्यवरांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींना शपथ दिली. मोदी यांनी देशाची सेवा करण्यासाठी आणि समृद्धीकडे नेण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

कंगना रणौत, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अनुपम खेर यांसारख्या बॉलीवूड स्टार्सनी या कार्यक्रमात हजर राहून मोदींवर विश्वास व्यक्त केला. नुकतीच मंडी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेली कंगना रणौत, पांढऱ्या आणि सोनेरी साडीत या सोहळ्यात हजर होती. या सोहळ्याला उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्यासह उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. साऊथ अभिनेता नितीन स्टारर 'रॉबिनहूड'च्या टीमनं सेटवर रामोजी राव यांना वाहिली आदरांजली... - RAMOJI RAO PASSES AWAY
  2. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजपूर्वी दीपिका पदुकोणचं नवीन पोस्टर केलं रिलीज - Kalki 2898 AD
  3. अभिनेता विजय सेतुपतीनं रामोजी राव यांना वाहिली श्रद्धांजली - Vijay Sethupathi on Ramoji Rao Demise

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.