ETV Bharat / entertainment

क्रिती खरबंदानं 14 वर्षांच्या करिअरमध्ये बॉलिवूडमध्ये दिला फक्त एक हिट, जाणून घ्या चित्रपटाचं नाव... - BIRTHDAY SPECIAL KRITI KHARBANDA

क्रिती खरबंदाचा आज 29 ऑक्टोंबर रोजी वाढदिवस आहे. आजचा दिवस तिच्यासाठी खूप विशेष असून या प्रसंगी आपण तिच्या चित्रपटाबद्दल जाणून घेऊया.

kriti kharbanda
क्रिती खरबंदा (क्रिती खरबंदा - (instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 29, 2024, 10:24 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा आज तिचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रितीनं तिच्या 14 वर्षांच्या करिअरमध्ये 37 हून अधिक साऊथ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलंय. तिनं बॉलिवूडमध्ये 6 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, आत्तापर्यंत तिनं बॉलिवूडमध्ये एकही सोलो हिट दिलेला नाही. क्रितीच्या बॉलिवूड चित्रपटांपैकी फक्त 1 'हाऊसफुल 4' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. हा चित्रपट मल्टीस्टारर चित्रपट होता. आतापर्यत बॉलिवूडमध्ये क्रितीनं पाहिजे तसं नाव कमावलं नाही. दरम्यान आज क्रितीच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड स्टार्ससह चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यामातून तिला शुभेच्छा देत आहेत.

क्रिती करिअरची सुरुवात : क्रितीनं तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक पिपल्ला राजच्या 'बोनी' (2009) मधून करिअरची सुरुवात केली. हा एक ॲक्शन चित्रपट होता. क्रितीचा 'बोनी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. मात्र क्रितीच्या अभिनयाला समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली होती. पुढं तिनं कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिचा, चिरू (2010) पहिला कन्नड चित्रपट होता. क्रितीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यानंतर ती 'आला मोडलांडी' (2011) मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली, जो रोमँटिक-कॉमेडी चित्रपट होता. यानंतर ती तेलुगू चित्रपट 'तीन मार' (2011) मध्ये मुख्य भूमिकेत दिसली, जो हिंदी चित्रपट 'लव आज कल' (2009) चा रिमेक होता.

क्रितीचा पहिला बॉलिवूड चित्रपट : साऊथ सिनेमात नाव कमावल्यानंतर क्रिती बॉलिवूडकडे वळली. तिनं 2015 मध्ये मुंबईत तिचा संघर्ष सुरू ठेवला. क्रितीचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'राज: रीबूट' 2016 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर ती कार्तिक आर्यनबरोबर 'गेस्ट इन लंडन'मध्ये दिसली. मात्र हा चित्रपट देखील तिचा रुपेरी पडद्यावर फ्लॉप झाला. यानंतर तिनं 'शादी में जरूर आना' या चित्रपटात राजकुमार रावबरोबर स्क्रिन शेअर केली. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकला नाही, मात्र या चित्रपटामधील तिचा अभिनय अनेकांना आवडला. तिचा 2019मध्ये 'हाऊसफुल 4 ' चित्रपट आला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला. आता देखील क्रिती बॉलिवूडमध्ये संघर्ष करत आहे.

हेही वाचा :

  1. पुलकित आणि क्रितीच्या लग्नाच्या रिसेप्शनचे सुंदर फोटो, पाहा खास क्षण - Pulkit and kriti wedding reception
  2. Pulkit and Kriti Kharbanda : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नानंतर मुंबईला परतले, विमानतळावर केले मिठाई वाटप
  3. रकुल प्रीत सिंग ते क्रिती खरबंदा 'या' नववधू पहिला होळी साजरी करण्यासाठी सज्ज - first festival of colors

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.