ETV Bharat / entertainment

फिल्म इंडस्ट्रीतील उदयासह अधिराज्य गाजवणारा प्रतिभावान पॉवरहाऊस स्टार अल्लू अर्जुन - Allu Arjun Birthday - ALLU ARJUN BIRTHDAY

Allu Arjun Birthday Special: अल्लू अर्जुननं 'गंगोत्री'मधील पदार्पणापासून ते 'पुष्पा: द राइज' सारख्या अलीकडील सर्वाधिक ब्लॉकबस्टर चित्रपटापर्यंतचा कलाकार म्हणून केलेला प्रवास आचंबित करणारा आहे. त्यानं 21 वर्षांच्या कारकिर्दीत 20 चित्रपटातून काम केलं आणि सर्वाधिक सुपरहिट चित्रपट देण्याचं श्रेयही मिळवलंय. आज तो आपला 42 वा वाढदिवस साजरा करत असताना दोन दशकांमध्ये अल्लू अर्जुननं त्याच्या समृद्ध कौटुंबिक वारशाशिवाय स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे

Allu Arjun Birthday Special
पॉवरहाऊस स्टार अल्लू अर्जुन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 11:02 AM IST

मुंबई - Allu Arjun Birthday Special: रुपेरी पडद्यावरचा नायक म्हणून 20 चित्रपटात भूमिका साकारलेल्या अल्लु अर्जुनच्या नावावर यापैकी 7 ब्लॉकबस्टर आणि 6 सुपरहिट चित्रपट आहेत. गेल्या दोन दशकाच्या त्याच्या अभिनय कारकिर्दीमध्ये सर्वाधिक हिट्स देण्याचं श्रेय त्याच्याकडे जातं. 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आज अल्लु अर्जुन आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक आघाडीचा लोकप्रिय नायक ते सर्वोत्कृष्ट अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास त्यानं कसा केला, अभिनयाचा वारसा लाभलेल्या मोठ्या सुपरस्टार्सच्या कुटुंबातही त्यानं स्वतःची ओळख कशी निर्माण केली यावर एक नजर टाकूया.

8 एप्रिल 1982 रोजी तामिळनाडूमधील चेन्नई शहरात तेलुगू कुटुंबात त्याचा जन्म झाला. तेलुगु चित्रपटसृष्टीतील दिग्गज कॉमेडियन आणि निर्माता अल्लू रामलिंगय्या यांचा तो नातू आहे. त्याला सुरुवातीला अभिनयापेक्षा अ‍ॅनिमेटर होण्यात जास्त रस होता. परंतु कौटुंबिक वातावरणाच्या प्रभावाने अखेर त्याची पावलं अभिनयाच्या दिशेनं पडली.

Allu Arjun Birthday Special
सुपरहिट ते ब्लॉकबस्टर चित्रपट

सुरुवातीच्या काही वर्षात तो आपल्या डान्स स्टाईल आणि अ‍ॅक्शनसाठी ओळखला जात होता. असे असले तरी एक अभिनेता म्हणून त्याची क्षमता सिद्ध करण्यासाठी आणि विविध प्रेक्षकांशी जोडण्यासाठी त्याला काही वर्षे लागली. गेल्या काही वर्षांत अल्लू अर्जुनने त्याच्या अनेख्या करिष्माई स्क्रीन अॅपिरियन्समुळे, विशेषत: तरुणांमध्ये मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

दिग्गज दिग्दर्शक के. राघवेंद्र राव यांनी दिग्दर्शित केलेल्या 'गंगोत्री' (2003) या चित्रपटातून त्यानं आपल्या अभिनयाची सुरुवात केली. तो एका प्रतिष्ठित फिल्मी कुटुंबातील उदयोन्मुख कलाकार म्हणून अल्लु अर्जुननं 'मवय्यादी मोगलथूरू' या गाण्यावरील परफॉर्मन्समध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि अल्लू अर्जुनने त्याचे वडील अल्लू अरविंद आणि सी. अश्विनी दत्त यांनी संयुक्तपणे बनवलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या कारकिर्दीचा पाया घातला.

सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आर्या' (2004) चित्रपटानं अल्लु अर्जुनच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी मिळाली. या चित्रपटात अल्लू अर्जुनने 'आर्या' नावाच्या आनंदी-नशीबवान तरुणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या सुकुमारने या रोमँटिक ड्रामा चित्रपटात कॉमेडी, अॅक्शन आणि इमोशन्स यांचे मिश्रण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.

Allu Arjun Birthday Special
अफाट लोकप्रिय अल्लु अर्जुन

'आर्या' या चित्रपटाचे दाक्षिणात्य भाषेतही डबिंग करण्यात आलं आणि केरळमध्येही अल्लू अर्जुनला सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली. त्याला केरळमध्ये मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग लाभले आहे. आर्याच्या यशाचे एक श्रेय संगीतकार देवी श्री प्रसाद यांनाही जातं. ज्यांनी 'फील माय लव्ह' आणि 'नुववुंटे' सारखी सुपरहिट गाणी या चित्रटाला दिली. 'आ अंते अमलापुरम' हे गाणं तर राज्याच्या सर्व सीमा ओलांडून परदेशातही हिट झालं. देशभर महाविद्यालयातील तरुणाईनं या गाण्याला प्रतिसाद दिला. पुढच्या काही वर्षामध्ये त्यानं 'बनी' (2005), 'देसमुदुरू' (2007), आणि 'पारुगु' (2008) यासारख्या कर्मशिएल सुपरहिट चित्रपटांचा सिलसिला जारी ठेवला. यातून त्याचं फिल्म इंडस्ट्रीतील स्थान भक्कम होत गेलं.

2009 मध्ये दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुन यांची जोडी 'आर्या 2' च्या निमित्तानं पुन्हा एकत्र आली. हा त्यांच्या 2004 मधील चित्रपटाचा सीक्वेल होता. याला प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आलेल्या त्याच्या 'वरुडू' आणि 'वेदम' चित्रपटांनाही फरसं यश मिळालं नाही. पण 'वेदम'मधील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला.

Allu Arjun Birthday Special
दिग्दर्शक सुरुमारसह अल्लु अर्जुन

अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीत पुन्हा बहर यायला 'बद्रीनाथ' (2011) च्या रिलीजने सुरुवात झाली. त्यानंतर सुपरहिट 'जुलई' (2012) या चित्रपटाने सुरुवात केली. त्यानंतर अल्लु अर्जुननं 'इद्दराममायिलाथो' (2013) आणि 'येवडू' (2014) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर त्याने पुन्हा 'रेस गुर्रम' (2014) हा सुपरहिट चित्रपट दिला.

Allu Arjun Birthday Special
सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट

त्यानंतर त्यानं 'रुद्रमादेवी' (2015) या ऐतिहासिक ड्रामा चित्रपटात काम केलं पण हा एक अ‍ॅव्हरेज सिनेमा ठरला. परंतु 'सररैनोडू' (2016) आणि दुव्वाडा जगन्नाधम (2017) सारख्या चित्रपटांनी पुन्हा एकदा मजबूत पकड मिळवली. दोन्ही ब्लॉकबस्टर हिट्स चित्रपटानं त्याचे मास अपील आणि स्टारडम आणखी वाढले.

अल्लू अर्जुननं 2020 मध्ये त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित 'अला वैकुंठपुररामुलू' या चित्रपटामध्ये अभिनय केला आणि हा एक प्रचंड व्यावसायिक यश देणारा चित्रपट ठरला आणि तेलुगु सिनेमातील एक प्रमुख स्टार म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत केले. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये कार्तिक आर्यननं मुख्य भूमिका साकारली होती.

Allu Arjun Birthday Special
सुपरहिट ते ब्लॉकबस्टर चित्रपट

अल्लू अर्जुन जेव्हा यश आणि वाढत्या स्टारडमवर उंच भरारी घेण्यासाठी उत्सुक होता तेव्हा त्यानं पुन्हा एकदा दिग्दर्शक सुकुमार बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी मिळून 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाला आकार दिला आणि या चित्रपटाचा डंका संपूर्ण जगात वाजला. कोरोना महामारीनंतरचा पहिला भारतीय ब्लॉकबस्टर हिट चित्रपट झाला आणि प्रेक्षकांची संख्या कमी झाली असतानाही त्यांना पुन्हा थिएटरमध्ये परत आणण्याचे श्रेय या चित्रपटाला मिळाले.

Allu Arjun Birthday Special
सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुष्पातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना अल्लु अर्जुन

भारतामध्ये आणि यू.एस., यू.के. आणि यू.ए.ई. सारख्या मार्केटमध्येही हिट झाल्यानंतर 'पुष्पा: द राइज'ने प्राइम व्हिडिओ ओटीटीवर प्रवाहित होण्यास सुरुवात केली तेव्हा त्यालाही अफाट प्रेक्षक लाभला. यातून 'पुष्पा'ची पोहोच प्रेक्षकांमध्ये आणखी वाढली. यामुळे अल्लु अर्जुनची लोकप्रियता आणि स्टारडममध्येही भर पडली.

Allu Arjun Birthday Special
दुबई मादाम तुसाद संग्रहालयातील अल्लु अर्जुनचा पुतळा

अलिकडेच दुबईतील मादाम तुसाद येथे अल्लु अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याचे लॉन्चिंग करण्यात आले. यासाठी तो स्वतः हजर होता. आता तो त्याच्या आगामी 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. या चित्रपटात तो पुष्पा या लाल चंदन तस्कराच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा जास्त भव्य असणार असल्याची गॅरंटी स्वतः अल्लु अर्जुनने जगभरातील प्रेक्षकांना दिली आहे. आता जगभरातील त्याचे तमाम चाहते 'पुष्पा 2' ची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. आगामी काळात तो संदीप रेड्डी वंगा या आणखी एका यशस्वी दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार आहे. प्रतिभेच्या या पॉवरहाऊस अल्लु अर्जुनला त्याच्या वाढदिवसानिमित्त ईटीव्ही भारतकडून हार्दिक शुभेच्छा.!!

हेही वाचा -

  1. अल्लू अर्जुननं 'पुष्पा: द रुल'च्या म्यूझिक रेकॉर्डिंग स्टुडिओतील संगीतकार आणि दिग्दर्शकाबरोबरचा फोटो केला शेअर - Pushpa The Rule
  2. अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा 2' रिलीजचे 200 दिवसांचे काउंटडाउन सुरू
  3. Allu Arjun receives grand welcome : अल्लु अर्जुनचं हैदराबादमध्ये जंगी स्वागत, ढोल ताशांसह फटाक्यांची आतषबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.