ETV Bharat / entertainment

बिपाशा बसूनं प्रसूतीनंतर मुलगी देवीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, पाहा झलक - Bipasha Basu - BIPASHA BASU

Bipasha Basu : बिपाशा बसूनं मुलगी देवीबरोबरचा सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिपाशा मुलीसह ऑपरेशन थिएटरमध्ये दिसत आहे.

Bipasha Basu
बिपाशा बसू ((bipasha basu instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 11:00 AM IST

Updated : May 14, 2024, 11:49 AM IST

मुंबई - Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बसू आता लाइमलाइटपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असते. दीड वर्षांपूर्वी बिपाशा आई झाली. तिचा आई होण्याचा प्रवास सोपा नव्हता. बिपाशा मुलगी देवी आणि पती करण सिंग ग्रोव्हरबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिनं सोमवारी मुलगी देवीच्या जन्म झाल्यानंतरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आई आणि मुलामधील प्रेमळ नाते दिसून येते. हा फोटो प्रसूतीनंतर घेतला गेला आहे. बिपाशा जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये पहिल्यांदा तिच्या मुलीला भेटली होती,तेव्हाचा हा क्षण तिच्यासाठी खूप खास होता.

बिपाशा बसूनं देवीबरोबरचा फोटो केला शेअर : फोटोमध्ये बिपाशा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एका बेडवर दिसत आहे आणि एक डॉक्टर मुलीसह तिच्या जवळ उभी आहे. फोटोत बिपाशा आणि मुलीचे डोळे बंद असल्याचं दिसत आहे. बिपाशानं ही पोस्ट शेअर करताना लिहिलं,"मदर्स डेच्या सन्मानार्थ पहिला फोटो तुमच्या मुलीबरोबरचा शेअर करा.' याशिवाय तिनं या पोस्टमध्ये पांढऱ्या रंगाचं हार्ट देखील जोडलं आहे. तसेच फोटो व्यतिरिक्त तिनं देवी आणि करणबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती देवीला फुल देत तिला हॅपी बर्थडे म्हणताना दिसत आहे. बिपाशानं शेअर केलेला व्हिडिओ खूप आकर्षक आहे.

बिपाशा आणि करणचं लग्न : बिपाशानं एप्रिल 2016 मध्ये अभिनेता करण सिंह ग्रोवरबरोबर लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. 'अलोन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीकता वाढली. यानंतर त्यांनी एकमेंकाना डेट करण्यात सुरुवात केली. त्यांच्या मुलीचा जन्म नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. दरम्यान, बिपाशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटी 2020 क्राईम थ्रिलर वेब सीरिज 'डेंजरस' मध्ये करण सिंग ग्रोव्हरबरोबर दिसली होती. तेव्हापासून ती मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. याशिवाय ती 'द कपिल शर्मा शो'मध्ये ती पाहुणी म्हणून आली होती. सध्या बिपाशा चित्रपटांपासून दूर राहून मातृत्वाचा आनंद घेत आहे.

हेही वाचा :

  1. राखी सावंत टॉवेल आउटफिटमध्ये कार्यक्रमात झाली सहभागी, युजर्सला आली मेट गालाची आठवण - RAKHI SAWANT
  2. रिया चक्रवर्ती तिच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू करणार, पोस्ट करून दिली हिंट - rhea chakraborty
  3. टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामचे निधन, रस्ता अपघातात जागीच मृत्यू - Pavitra Jayaram passed away

Last Updated : May 14, 2024, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.