ETV Bharat / entertainment

आर्या जाधवनंतर वैभव चव्हाणला शोमधून 'बिग बॉस'नं दाखवला बाहेरचा रस्ता, नवीन प्रोमो रिलीज - Bigg Boss Marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5 : आर्या जाधव आणि वैभव चव्हाण हे दोघेही 'बिग बॉस' शोमधून बाहेर पडले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये नवीन कॅप्टन्सी टास्क होताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 16, 2024, 3:49 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5 'चा आठवा आठवडा सुरू झाला आहे. आता नुकत्याच झालेल्या 'भाऊच्या धक्का'वर खूप धमाल पाहायला मिळाली. याशिवाय काही यावेळी हळवे क्षण पाहायला मिळाले. रविवारी झालेल्या धक्क्याच्या शेवटी वैभव चव्हाण एलिमिनेट झाला. यावेळी अरबाज पटेल हा हळवा झाल्याचं दिसलं. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी वर्षा, वैभव, अंकिता आणि अभिजीत हे सदस्य नॉमिनेट होते. या शोमध्ये वैभव आणि अरबाजमध्ये चांगली मैत्री होती. दरम्यान निक्की तांबोळीच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी आर्या जाधवला 'बिग बॉस'नं नियमाचं उल्लंघन केल्यामुळे घराबाहेर काढलं आहे.

घरातील नवीन कॅप्टन्सी टास्क : कॅप्टन्सी टास्कचं फुटेज वारंवार पाहिल्यानंतर आर्यानं हे मुद्दाम केल्याचं स्पष्ट झालं. 'बिग बॉस'च्या घरात हिंसेचं समर्थन कधीच करणार नाही, ही गोष्ट सांगत आर्याला घराबाहेर काढण्यात आलं. दरम्यान 'बिग बॉस' च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी किल्लेकर घरातील दुसऱ्या टास्कबद्दल सदस्यांना सांगताना दिसत आहे. प्रोमोमध्ये जान्हवी म्हणते, "या आठवड्यात घरावर असणार जंगलराज, शिकारीची बंदूक जास्त वेळा मिळवून या कार्यात यशस्वी होऊ शकता." यानंतर अरबाज आपल्या टीमला या टास्कमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसतो. तसेच निक्की हा टास्क जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. यानंतर या टास्कदरम्यान जान्हवी किल्लेकर खाली पडते. तेव्हा अभिजीत सावंत हा तिला पाणी देण्यात यावं, अशी विनंती करतो.

धनंजय पोवार अंकितावर नाराज : याशिवाय घरात डीपी दादा उर्फ धनंजय पोवार हा अंकिता वालावलकरवर नाराज असल्याचं दिसून येत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये त्यानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आजच्या एपिसोडमध्ये घरात पुन्हा एकदा सदस्यांचा कल्ला ऐकायला मिळणार आहे. आजचा टाक्स हा खूप मनोरंजक असणार आहे. दरम्यान निर्मात्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यूजर्स आर्याला बाहेर काढल्याबद्दल 'बिग बॉस'वर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. रितेश देशमुख 'भाऊचा धक्का', निक्की तांबोळीला कानशिलात लगावल्याबद्दल आर्या जाधवला फटकारलं - riteish deshmukh
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये आर्या जाधवनं कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की तांबोळीला लगावली कानशिलात - bigg boss marathi
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावंकर यांच्यात भाजीवरुन झाली झुंज - Nikki Tamboli VS Varsha Usgaonkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.