ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुख निक्की तांबोळीला देणार मोठी शिक्षा, प्रोमो व्हायरल - BIGG BOSS MARATHI - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी 5' शोमध्ये आजच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर निक्की तांबोळीला मोठी शिक्षा भेटणार आहे. आता बिग बॉस निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज केला आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 7, 2024, 3:59 PM IST

मुंबई- Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी 5' हा शो वेगवेगळ्या कारणामुळं सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा शो सुरू झाल्यापासून घरात अनेक सदस्यामध्ये वाद होताना दिसले. याशिवाय घरातील टास्कदरम्यान देखील अनेकदा वाद प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. हा शो आता प्रेक्षकांना खूप पसंत पडत आहे. टीम ए आणि टीम बीमध्ये फूट पडल्यानंतर हा शो आणखीचं मनोरंजक झाला आहे. बिग बॉसमध्ये कधी प्रेम, भांडणे, ड्रामा यामुळे प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होत आहे. दरम्यान प्रेक्षक हे भाऊच्या धक्क्याची वाट खूप आतुरतेनं पाहात असतात. भाऊच्या धक्क्यात यावेळी या आठवड्यातही निक्की तांबोळीला शिक्षा होणार असल्याचं दाखविण्यात येणार आहे.

रितेश देशमुख देणार निक्की तांबोळीला धक्का : बिग बॉस निर्मात्यांनी आता इंस्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये रितेश देशमुख हा निक्कीला भाऊच्या धक्क्यावर खडेबोल सुनावताना दिसत आहे. आज 7 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये निक्कीला मोठी शिक्षा भेटणार असल्याचा अंदाज आता सोशल मीडियावर लावला जात आहे. निक्की ही अनेक दिवसांपासून घरात आपली मनमानी करताना दिसत आहे. प्रोमोत रितेशनं निक्कीला म्हटलं, "निक्की ही आहे तुमची जागा, मी तुझं गेल्या आठवड्यात कौतुक केलं होतं. कधी पण कौतुक हे आपल्या मनात ठेवायचं असतं, कारण कौतुक जेव्हा डोक्यात जात ना, तेव्हा त्याची हवा होते. जर डोक्यात हवा गेली तर आपल्या स्वत:वरचा कन्ट्रोल सुटतो, आपल्यात माज येतो. यानंतर आपण कसही वागायला आणि बोलायला लागतो. या आवड्यात निक्की तू तेच केलं आहे."

रितेश देईल निक्कीला शिक्षा : आता या प्रोमोवर अनेकजण भरभरून कमेंट्स करून निक्कीला ट्रोल करताना दिसत आहेत. निक्कीनं या आठवड्यात घरातील कोणतंही काम करण्यास नकार दिला. किचनशिवाय कोणतंही काम करणार नसल्याचं तिनं सांगितलं होत. सुरज चव्हाण कॅप्टन झाला, यानंतर पहिल्याचं दिवशी निक्कीनं चहा बनवला. यावर आर्या जाधव आणि निक्कीमध्ये भांडणे झाली. निक्कीनं चहाची भांडी घासण्यास नकार दिला होता. या दोघींचा वाद खूप वाढला, यानंतर निक्कीनं आर्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली.आर्यानं संतापून म्हटलं, "बाप काढायचा नाही." निक्कीच्या या वागण्यावर रितेश तिला चांगलाचं धक्का देणार आहे. यात रितेश निक्कीला घराच्या कॅप्टन होऊ शकत नसल्याची शिक्षा देणार आहे. याशिवाय आणखी दुसरी शिक्षा काय असेल, याबद्दल आजच्या एपिसोडमध्ये माहित होईल.

हेही वाचा :

  1. बिग बॉस शोमधील नवीन कॅप्टन कोण असणार?, पाहा प्रोमो - बिग बॉस मराठी 5
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये कॅप्टन्सी टास्कसाठी होणार जोरदार टक्कर, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi
  3. 'बिग बॉस मराठी 5'च्या नवीन टास्कमध्ये वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल यांच्यात झाली लढत - bigg boss marathi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.