ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'च्या नवीन टास्कमध्ये वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल यांच्यात झाली लढत - bigg boss marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी 5'च्या मंगळवारी झालेल्या एपिसोडमध्ये नवीन टास्कदरम्यान वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल यांच्यात जोरदार भांडणे होताना दिसली. दरम्यान आजच्या एपिसोडमध्ये आर्या जाधव आणि निक्की तांबोळीमध्ये वाद होताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2024, 3:12 PM IST

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी 5'चा सहावा आठवडा सुरू झाला आहे. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळणार आहेl. दरम्यान घरात यावेळी अधिकच आव्हानात्मक टास्क प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या आठवड्यात घरातील सदस्यांना बिग बॉसनं 'बीबी फार्म' हा नवीन टास्क दिला होता. या टास्कमध्ये, मंगळवारच्या एपिसोडमध्ये वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल यांच्यात चांगलीच झुंज पाहायला मिळली. आता आजच्या एपिसोडमध्येही घरातील सदस्यांमध्ये कल्ला होताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात सदस्यांना टास्कमध्ये बीबी फार्मची जबाबदारी देण्यात आली आहे.

बीबी करन्सी मिळविण्यासाठी होणार घरात कल्ला : या टास्कमधील गुणांच्या आधारे बीबी करन्सी टीमला देण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या एपिसोडनमध्ये वैभव आणि अरबाज यांच्यात भांडणं पाहायला मिळाली. याशिवाय या टास्कदरम्यान घरातील इतर काही सदस्य देखील आक्रमक होताना दिसले. हा आक्रमकपणा पाहून बिग बॉसनं घरातील सदस्यांना शिक्षा सुनावली. आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बाद करावं लागेलं, असं सांगण्यात आलं. दरम्यान बिग बॉस निर्मात्यांनी एक प्रोमो शेअर केला आहे. यात निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यात शा‍ब्दिक चकमक होताना दिसत आहे. या टास्कमध्ये जान्हवी किल्लेकर जिंकण्यासाठी चांगलीच झुंज देताना दिसणार आहे.

'बिग बॉस मराठी 5'च्या सहाव्या आठवड्यात कोण झालं नॉमिनेट : याशिवाय या टास्कदरम्यान सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार आणि इतर सदस्यही जिंकण्यासाठी जोर लावताना दिसणार आहेत. या टास्कमध्ये घरातील सर्वच सदस्य कल्ला करताना दिसतील. या आठवड्यात बिग बॉसमध्ये आर्या जाधव, सूरज चव्हाण, घनश्याम दरवडे, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, अभिजीत सावंत आणि अरबाज पटेल हे सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या सात जणांमधून घराबाहेर कोण जाणार? यावर सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आजच्या एपिसोडमध्ये कुठली टीम जास्त बीबी करन्सी मिळवेल हे पाहणं खूप मनोरंजक असणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घरातील नॉमिनेशन टास्कमुळे जान्हवी आणि घनश्यामध्ये होईल झुंज - bigg boss marathi
  2. निक्की-अरबाजमध्ये जवळीकता वाढल्यानं 'ही' व्यक्ती नाराज, थेट सोशल मीडियावर केली पोस्ट - BOSS MARATHI 5 PROMO VIRAL
  3. बिग बॉसच्या घरातील सदस्यांना 'भाऊचा धक्का' नव्हे 'शॉक', नव्या प्रोमोनं वाढली उत्सुकता - bigg boss marathi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.