ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 18'च्या 'वीकेंड का वॉर'मध्ये गधराज घरातून बाहेर, निर्मात्यांनी शेअर केली पोस्ट - GADHRAJ ON BIGG BOSS 18

'बिग बॉस 18'चा पहिला 'वीकेंड का वॉर' हा खूप मनोरंजक होता. शोच्या 19व्या स्पर्धकाला बीबीच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

Bigg Boss 18
बिग बॉस 18 (बिग बॉस 18 (Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 14, 2024, 11:30 AM IST

Updated : Oct 14, 2024, 2:36 PM IST

मुंबई : ' बिग बॉस 18'चा पहिला 'वीकेंड का वॉर' पार पडला आहे. हा सीझन खूपच मनोरंजक असल्याचे दिसत आहे. या शोमध्ये रोजचं प्रेक्षकांना वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. 'बिग बॉस'च्या घरात बॉलिवूड आणि टीव्हीचे अनेक सेलिब्रिटी आले आहेत. रविवारी सलमान खाननं शोमधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा केली. पहिल्या 'वीकेंड का वार'मध्ये 19व्या स्पर्धकाला शो सोडावा लागला. आता 'बिग बॉस'च्या घरात 18 स्पर्धक आहेत. यांच्यात आता जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 18'मधून बाहेर काढल्या गेलेला स्पर्धक कोण आहे, याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोण गेलं घरातून बाहेर ? : होस्ट सलमान खाननं घोषणा केली की, 'या आठवड्यात 19वा स्पर्धक म्हणजेच गधराज घराबाहेर असेल आणि इतर सर्व सदस्य सुरक्षित असतील. सलमानच्या या घोषणेनंतर, सर्व घरातील सदस्य हे खुश झाल्याचे दिसले. 'बिग बॉस 18'च्या पहिल्या आठवड्यात,घरातील सदस्यांनी करणवीर मेहरा, गुणरत्न, चाहत अविनाश आणि मुस्कान यांना नॉमिनेट केले गेले होते. काही दिवसांपूर्वी प्राणी संघटना द पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (PETA)नं 'बिग बॉस 18'च्या निर्मात्यांना एक ऑर्डर जारी केली होती. पेटानं निर्मात्यांना गधराज (गाढव) घरातून काढून टाकण्याची विनंती केली होती.

गधराजचा व्हिडिओ व्हायरल : पेटानं 'बिग बॉस 18'मधील गधराजची एक क्लिप आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केली होती. यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 'पेटा इंडिया शोमध्ये प्राण्यांचा वापर थांबवण्यासाठी होस्ट सलमान खान आणि 'बिग बॉस'ला विनंती करत आहे आणि गाढव मैक्सला सॅनचरीमध्ये ट्रांसफर करण्यासाठी मदत करा.' 'बिग बॉस 18' 6 ऑक्टोबरपासून कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रसारित झाला आहे. यावर्षी निर्मात्यांनी शोमध्ये स्पर्धक 19 सादर केले आहेत. या शोचा 19वा स्पर्धक हा माणूस नसून गाढव होता, याला निर्मात्यांनी गधराज असं नाव दिलं होतं. गधराजला शोमध्ये समाविष्ट करण्यामागील, कारण प्रेक्षकांना समजले नाही. गधराज हा एका आठवड्यात प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 18'मधील पहिल्या नॉमिनेशनसाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ

Last Updated : Oct 14, 2024, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.