ETV Bharat / entertainment

गुणरत्न सदावर्ते यांची केली बिग बॉससह चाहत्यांनी आठवण, घरातील 10 स्पर्धक झाले नॉमिनेट... - BIGG BOSS 18

'बिग बॉस 18'च्या घरात दुसऱ्या आठवड्यासाठी 17 पैकी 10 स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. तसेच 'बिग बॉस'मध्ये गुणरत्न सदावर्ते नसल्यानं प्रेक्षक त्यांची आठवण करत आहेत.

Bigg Boss 18
बिग बॉस 18 (बिग बॉस 18 - (@officialjiocinema Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 16, 2024, 11:33 AM IST

मुंबई : 'बिग बॉस 18' शो 19 स्पर्धकांसह 6 ऑक्टोबरपासून कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर सुरू झाला. हा शो आता प्रेक्षकांमध्ये धुमाकूळ घालत आहे. 'बिग बॉस 18' प्रसारित होऊन एका आठवड्याहून अधिक काळ झाला आहे. आता बिग बॉसच्या घरात 17 स्पर्धक उरले आहेत. दरम्यान, मंगळवारी, निर्मात्यांनी दुसऱ्या आठवड्याच्या एलिमिनेशनसाठी एक टास्क सेट केला होता. यामध्ये 17 पैकी 10 स्पर्धकांना नॉमिनेट केले गेले होते. गेल्या आठवड्यात सलमान खाननं 19वा स्पर्धक गधराज (गाढव) याला काढून टाकण्याची घोषणा केली होती. पेटा इंडियानं गधराजच्या संदर्भात निर्मात्यांविरोधात नोटीस जारी केली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

गुणरत्न सदावर्ते यांची प्रेक्षकांनी केली आठवण : यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना देखील एका केस संदर्भात 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडावे लागले होते. आता ते या शोमध्ये दिसत नसल्यानं अनेकजण त्यांची आठवण करताना दिसत आहेत. 'बिग बॉस 18'च्या फॅनपेज 'बिग बॉस तक'नं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. 'डॉ. गुणरत्न सदावर्ते उर्फ डंकू काका तुम्हाला मिस करत आहे. 'बिग बॉस 18'मध्ये लवकरच परत या.' आता या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका चाहत्यानं लिहिलं, 'आम्हाला तुमची आठवण येत आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'घरात तो एकमेव मनोरंजक पात्र होतं.' आणखी एकानं लिहिलं, 'हा व्यक्त खूप चांगला आहे, खूप मनोरंजन करतो.'

अविनाश आज बेघर होणार का? : आज 16 ऑक्टोबर रोजी एक प्रोमो रिलीज केला गेला आहे, यामध्ये अविनाश मिश्रा आणि चुम दरंग भांडताना दिसत आहेत. दरम्यान, चुम अविनाशसाठी अपशब्द वापरते. यानंतर अविनाश आणि चुममधील भांडण वाढून हाणामारीपर्यंत पोहोचते. दरम्यान, घरातील सदस्य दोन्ही स्पर्धकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे प्रकरण वाढत पाहून 'बिग बॉस' अविनाशला घरामधून बाहेर काढण्याची घोषणा करते. आता अविनाशला घरातून बाहेर काढले जाईल की यात त्यांची नवीन युक्ती असेल, हे पाहणं मनोरंजक असणार आहे.

बिग बॉस 18च्या दुसऱ्या आठवड्यात एलिमिनेशनसाठी 10 स्पर्धक नॉमिनेट...

करण वीर मेहरा

शिल्पा शिरोडकर

चाहत पांडे

अविनाश मिश्रा

श्रुतिका अर्जुन

रजत दलाल

तजिंदर सिंह बग्गा

एलिश कौशिक

हेमा शर्मा

मुस्कान बामने

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 18'मधून गुणरत्न सदावर्ते घराबाहेर, काय आहे प्रकरण जाणून घ्या...
  2. 'बिग बॉस 18'च्या 'वीकेंड का वॉर'मध्ये गधराज घरातून बाहेर, निर्मात्यांनी शेअर केली पोस्ट
  3. 'बिग बॉस 18'मधील पहिल्या नॉमिनेशनसाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.