मुंबई - Bhushan Kumar and Divya Khosla divorce rumours : टी-सीरीजचे मालक भूषण कुमार आणि त्यांची पत्नी दिव्या खोसला कुमार यांच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकदा ॲक्टिव्ह असलेली दिव्या खोसला कुमारने तिच्या नावातून 'कुमार' हे आडनाव हटवल्याने घटस्फोटाबद्दलची चर्चा वाऱ्यासारखी पसरू लागली आहे. आता वेगाने पसरणाऱ्या घटस्फोटाच्या बातम्यांवर भूषण कुमार आणि दिव्यानं एक वक्तव्य जारी केले आहे. टी-सीरीज प्रवक्त्यानं अखेर दिव्या आणि भूषणच्या नात्याबद्दलचा खुलासा केला आहे.
दिव्या खोसला आणि भूषण कुमारच्या नात्यामधील सत्य : भूषण कुमार आणि दिव्याच्या घटस्फोटाच्या बातम्या झपाट्याने पसरऱ्यानंतर, या जोडप्यानं त्यांच्या कंपनी टी-सीरीजच्या प्रवक्त्याकडून एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये असं म्हटले आहे की, दिव्याची इच्छा आहे की तिने तिचे आडनाव काढून टाकावे. ज्योतिषशास्त्र आणि वस्तुस्थिती पाहता तिने हा निर्णय घेतला आहे. हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे, ज्याचा आदर केला पाहिजे. आडनावामध्ये एस (S) जोडणे हे ज्योतिषशास्त्रातील वस्तुस्थितीमुळे केले जाते आहे. दिव्या आणि भूषण कुमार यांचे लग्न 2005 मध्ये झाले होते. या दोघांना एक मुलगाही आहे.
दिव्या खोसला कुमारबद्दल : 2004 मध्ये दिव्यानं तेलुगू चित्रपट 'लव्ह टुडे' आणि हिंदी चित्रपट 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 2005 मध्ये लग्न झाल्यानंतर तिने 'सनम रे' चित्रपटातून 11 वर्षांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. यानंतर ती 'बुलबुल', 'सत्यमेव जयते 2' आणि 'यारियां 2'या चित्रपटांमध्ये दिसली आहे. 2014 मध्ये, दिव्याने तिचा पहिला चित्रपट 'यारियां' दिग्दर्शित केला होता. यानंतर तिनं 2016 मध्ये' सनम रे' या चित्रपटाचं दिग्दर्शन केले. निर्माता म्हणून दिव्यानं 'रॉय', 'खानदानी सफाखाना', 'बाटला हाऊस', 'मरजावां', 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी', 'लुडो', 'इंदू की जवानी' आणि 'यारियां 2' या चित्रपटांमध्ये गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा :