ETV Bharat / entertainment

'बाहुबली'च्या 'कालकेय'ची मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री, वाचा सविस्तर - marathi industry

Baahubali Kalakeya Prabhakar : 'बाहुबली' फेम साऊथ स्टार प्रभाकर हा मराठी इंडस्ट्रीत प्रवेश करत आहे. 'अहो विक्रमार्का' या चित्रपटात तो 'बेगाडा' नावाच्या खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

Baahubali Kalakeya Prabhakar
बाहुबली कालकेय प्रभाकर (social media)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 2:04 PM IST

मुंबई - Baahubali Kalakeya Prabhakar : 'बाहुबलीः द बिगिनिंग'मध्ये मुख्य भूमिकांबरोबर या चित्रपटामधील विकृत, क्रूर खलनायकाची म्हणजे, 'कालकेय'ची भूमिकाही प्रचंड गाजली होती. ही भूमिका साऊथ स्टार प्रभाकर यानं साकारली होती. 'कालकेय'ची भूमिका साकारल्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला होता. यासाठी चित्रपटरसिकांनी चाहत्यांनी देखील कौतुक केलं होतं. प्रभाकरनं साकारलेल्या 'कालकेय'च्या भूमिकेमुळे त्याला नवी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर प्रभाकरनं सिद्ध केलं की तो कोणत्याही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारू शकतो. आता हा 'कालकेय' म्हणजे अभिनेता प्रभाकर आता मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री करत आहे.

'बाहुबली' फेम अभिनेता करणार मराठी इंडस्ट्रीत प्रवेश : देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत 'अहो विक्रमार्का' मराठी व्यतिरिक्त इतर 5 भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 'अहो विक्रमार्का' या अ‍ॅक्शनपटात प्रभाकर एका जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. यात तो 'बेगाडा' नावाच्या खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 'अहो विक्रमार्का' पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट असून 6 भाषांमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा दिग्दर्शित 'अहो विक्रमार्का' मध्ये इमोशन्स, सूडनाट्य, आणि ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

'अहो विक्रमार्का' चित्रपटाबद्दल : 'अहो विक्रमार्का' हा चित्रपट जबरदस्त अ‍ॅक्शनपट असणार आहे. नायक खलनायकाची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडत असते. आता प्रभाकर आपल्या खलनायकी व्यक्तिरेखेची दहशत माजवण्यासाठी दमदार एन्ट्री करणार आहे. बलदंड शरीरयष्टी, भारदस्त आवाजाच्या जोरावर भेदक नजर आणि डायलॉग बोलण्याची अनोख्या अदाच्या जोरावर 'बेगाडा' हा खलनायक हा स्क्रिनवर थरारक दिसेल. आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी आणि अश्विनी कुमार मिश्रा निर्मित या चित्रपटाची कहाणी पेनमेत्सा प्रसादवर्मा यांची आहे, तर संगीत रवी बसरूर आणि आर्को प्रावो मुखर्जी यांनी दिलंय. या चित्रपटाचं छायांकन करम चावला आणि गुरु प्रसाद एन यांनी केलंय. 'अहो विक्रमार्का' हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो एकाच वेळी मराठी आणि तेलुगू या दोन भाषेत चित्रित होईल. आता या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.