ETV Bharat / entertainment

'बाफ्टा 2024' चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर'चं वर्चस्व - ओपेनहाइमरचं वर्चस्व

'BAFTA Awards 2024' : लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये 77वा बाफ्टा चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर' आणि 'पुअर थिंग्ज'नं अनेक पुरस्कार पटकावले.

BAFTA Awards 2024
बाफ्टा अवॉर्ड्स 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 9:59 AM IST

मुंबई - 'BAFTA Awards 2024' : लंडनमध्ये बाफ्टा अवॉर्ड्स म्हणजेच ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉर्ड्सचे आयोजन 18 फेब्रुवारीला करण्यात आलं होतं. यावर्षी अभिनेत्री दीपिका पदुकोण या पुरस्कार सोहळ्यात प्रस्तुतकर्ता म्हणून सहभागी झाली असून तिने दुआ लीपा आणि डेव्हिड बेकहॅम सारख्या सेलिब्रिटींबरोबर स्टेज शेअर केला आहे.

'बाफ्टा अवॉर्ड्स 2024'चे पुरस्कार जाहीर : बाफ्टा 2024च्या अवार्ड शोमध्ये 'ओपेनहाइमर'ला 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले, त्यापैकी 7 मध्ये चित्रपटाला पुरस्कार मिळाला. याशिवाय बाफ्टा अवॉर्ड्समध्ये 'पुअर थिंग्स'नं 5 श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून'ला नऊ नामांकन मिळाले होते. तसेच ब्रैडली कूपर स्टारर 'मेस्ट्रो'ला सात नामांकन मिळाले होते. याशिवाय 2023 मधील सर्वात मोठे बॉक्स ऑफिस चित्रपट, 'ग्रेटा गेरविग'च्या 'बार्बी'ला एकही पुरस्कार मिळाला नाही. 'बाफ्टा अवॉर्ड्स 2024' यादी तुम्ही खाली पाहू शकता.

पाहा बाफ्टा पुरस्कार 2024 संपूर्ण विजेत्यांची यादी-

सर्वोत्कृष्ट चित्रपट - ओपनहेमर (क्रिस्टोफर नोलन, चार्ल्स रोव्हन, एम्मा थॉमस)

उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट - द झोन ऑफ इंट्रस्ट

प्रमुख अभिनेता- सिलियन मर्फी

प्रमुख अभिनेत्री - एम्मा स्टोन (पूअर थिंग्स)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - 'द होल्डओवर्स' (डिव्हाईन जॉय रँडॉल्फ)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - रॉबर्ट डाउनी, जुनियर (ओपेनहायमर)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- ख्रिस्तोफर नोलन, (ओपनहायमर)

ओरिजनल स्कोर - ओपनहायमर

पोशाख डिझाइन - पूअर थिंग्स

डॉक्युमेंट्री- 20 डेज इन मारियुपोल

सिनेमॅटोग्राफी- ओपेनहायमर

उत्कृष्ट पदार्पण ब्रिटिश लेखक, दिग्दर्शक , निर्माता - अर्थ ममा

ॲनिमेटेड फिल्म- द बॉय एंड द हीरोन; हयाओ मियाजाकी, तोशियो सुजुकी

स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्स - पुअर थिंग्स; साइमन ह्यूजेस

ओरिजिनल स्क्रीनप्ले- ॲनाटॉमी ऑफ अ फॉल; जस्टिन ट्रायट, आर्थर हरारी

हेही वाचा :

  1. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' टायटल ट्रॅकचा टीझर रिलीज
  2. संजय कपूरची मुलगी शनाया कपूर चर्चेत, कारण काय?
  3. प्रियांका चोप्रा निक जोनासची मुलगी मालती मेरीचा बॉल पिटमध्ये खेळतानाचा फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.