ETV Bharat / entertainment

आयुष्मान खुराना आणि पॉप स्टार दुआ लिपा न्यूयॉर्कमधील टाईम 100 गालामध्ये होणार सहभागी - Ayushmann Khurrana - AYUSHMANN KHURRANA

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना आणि पॉप स्टार दुआ लिपा न्यूयॉर्क टाईम 100 गालामध्ये झळकणार आहे. या कार्यक्रमाच आयोजन टाइम मॅगझीन करत आहे.

Ayushmann Khurrana
आयुष्मान खुराना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 5:45 PM IST

मुंबई - Ayushmann Khurrana : अभिनेता आयुष्मान खुराना हा न्यूयॉर्कमधील टाईम 100 गालामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुष्मानला टाइम मॅगझिननं दोनदा सन्मानित केलं आहे. 2023 मध्ये, त्याला टाईम 100 इम्पैक्ट अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. या पुरस्कारासाठी निवड झालेला तो एकमेव भारतीय आहे. या मॅगझिनसाठी 2020 मध्ये जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याच नाव देखील सामील होत. आयुष्मान हा टाईम 100 गालामध्ये पॉप स्टार दुआ लीपाबरोबर दिसणार आहे. या कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक सोफिया कोपोला, अभिनेता, चित्रपट निर्माता इलियट पेज, अभिनेता काइली मिनोग, मायकेल जे फॉक्स आणि डिझायनर टोरी बर्च यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहू शकतात.

आयुष्मान खुरानाचं करिअर : आयुष्मान खुरानाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं चित्रपटसृष्टीत 'विकी डोनर' या चित्रपटामधून पदार्पण केलं होत. त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप गाजला होता. या चित्रपटामधील त्याचं गाणं देखील खूप हिट झालं होत. या चित्रपटानंतर त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. तो या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर यामी गौतम दिसली होती. अभिनयाबरोबर त्यानं संगीताच्या दुनियेतही खूप नाव कमावलं आहे. त्यानं 'पानी दा रंग' आणि 'साडी गली आजा' यासह अनेक हिट गाणी दिली आहेत. आयुष्माननं अनेक शोमध्ये आपल्या आवजाची जादू दाखवली आहे. आता आयुष्मान आपल्या संगीताला जागतिक पातळीवर घेऊन जात आहेत.

वॉर्नर म्युझिक इंडियाबरोबर आयुष्मानचा पहिला सहयोग : आयुष्माननं अलीकडेच वॉर्नर म्युझिक इंडियाबरोबर एक करार केला आहे. वॉर्नर म्युझिक इंडियाबरोबर त्यानं पहिलं गाण 'अख दा तारा' केलं आहे. त्याचं हे गाणं अनेकांना आवडलं आहे. दरम्यान त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आयुष्मान शेवटी 'ड्रीम गर्ल 2' मध्ये अनन्या पांडे, अन्नू कपूर आणि अभिषेक बॅनर्जीबरोबर दिसला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता पुढं तो 'बधाई हो 2' मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात त्याच्याबरोबर नीना गुप्ता असेल. याशिवाय तो 'ड्रीम गर्ल 3'मध्ये देखील झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान आणि सुहाना खान स्टारर 'किंग'चं होणार लंडनमध्ये शूटिंग... - Shah rukh Khan and Suhana Khan
  2. अभिनेत्री तमन्ना भाटियाला आयपीएलच्या अवैध स्ट्रीमिंग प्रकरणी सायबर पोलिसांचं समन्स - tamannaah bhatia
  3. 'हीरामंडी' प्रीमियरमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ दिसले एकत्र, व्हिडिओ व्हायरल - ADITI RAO HYDARI AND SIDDHARTH

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.