मुंबई - INDIAN 2 : साऊथचा सुपरस्टार कमल हासन सध्या त्यांच्या तामिळ ॲक्शन चित्रपट 'इंडियन 2'मुळे चर्चेत आहेत. हा तमिळ चित्रपट दिग्दर्शक एस. शंकर यांनी बनवला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. आता कमल हसनचे चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहात आहेत. 'इंडियन 2'च्या रिलीजच्या तारखेच्या बातम्याच्या दरम्यान, या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'इंडियन 2'च्या निर्मात्यांनी आज 6 एप्रिल रोजी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ते आज संध्याकाळी चाहत्यांना एक मोठी भेट देणार असल्याचं सांगताना दिसत आहेत.
'इंडियन 2' चित्रपटाबद्दल अपडेट : लायका प्रॉडक्शननं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आणि लिहिलं, ''सर्व लक्ष द्या, 'इंडियन 2' कडून रोमांचक अपडेट येत आहे, चला भ्रष्टाचाराविरुद्ध जीरो टोलेरेंससह एकजुटीने उभे राहूया, आज संध्याकाळी 6 वाजता घोषणा केली जाणार आहे.'' आता या चित्रपटाच्या पोस्टरबद्दल बोलायचं झालं तर, पोस्टर हे काळ्या रंगाचे आहे, ज्यावर 'उलगनायगन' कमल हासन यांच नाव आहे. याशिवाय पोस्टमध्ये, ''भ्रष्टाचार देशात कॅन्सरसारखा आहे, चला याचा अंत करूया, 'इंडियन्स 2' झिरो टॉलरन्स'' असं लिहिलं आहे.
'इंडियन 2'ची स्टारकास्ट : देशातील भ्रष्टाचार आणि कायद्याचे पालन न करणे यासारख्या विषयांवर चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शंकर यांनी 1996 मध्ये 'इंडियन' चित्रपट बनवला होता. या चित्रपटामुळे कमल हासन प्रसिद्धीझोतात आले होते. आता 28 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात भारतातील भ्रष्टाचार आणि राजकारणावरही फोकस करण्यात आला आहे. 'इंडियन 2' चित्रपटामध्ये कमल हासन व्यतिरिक्त प्रिया भवानी शंकर, रकुल प्रीत सिंह, काजल अग्रवाल, नेदुमुदी वेणु, सिद्धार्थ नारायण, ब्रह्मानंदम, योगी बाबू आणि इतर कलाकार दिसणार आहेत. दरम्यान कमल हासन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत, ज्यात 'कल्कि 2898 एडी', 'विक्रम 2' आणि 'ठग लाइफ' असे चित्रपट आहेत.
हेही वाचा :
- प्रेमिकांच्या चेहऱ्यासमोरील पुस्तकं हटली, चेहरे पाहून चुकले चाहत्यांचे सर्व अंदाज - PYAR KE DO NAAM MOVIE
- 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या एका दिवसाच्या स्टंटचा खर्च होता 3-4 कोटी, दिग्दर्शकानं केला खुलासा - Bade Miyan Chote Miyan
- 'द गोट लाइफ'ने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर गाठला 100 कोटींचा टप्पा, जाणून घ्या 10व्या दिवसाची कमाई - THE GOAT LIFE