मुंबई: कपिल शर्माच्या शोचा ग्रँड फिनाले एपिसोड या शनिवारी प्रसारित होणार आहे. त्यापूर्वी शोच्या निर्मात्यांनी त्याचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज केला आहे. फिनालेच्या एपिसोडमध्ये आगामी चित्रपट 'बेबी जॉन'चे कलाकार आणि क्रू दिसणार आहेत, यात वरुण धवन, कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि चित्रपट निर्माता ॲटली यांचा समावेश आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2'च्या प्रोमोमध्ये ग्रँड फिनाले एपिसोडमधील मजेदार दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यामध्ये ॲटली कपिल शर्माला तमिळ शिकवताना दिसत आहे. याशिवाय स्टेजवर वरुण धवन पोल डान्स करत असून सुनील ग्रोव्हर शाहरुख खानच्या भूमिकेत दिसत आहे.
सुनील ग्रोव्हर बनला फेक 'जवान' : प्रोमोच्या सुरुवातीला 'जवान'मधील शाहरुख खानच्या भूमिकेत सुनील ग्रोव्हर शानदार एन्ट्री करतो. यात तो म्हणतो, 'हा शो हायजॅक झाला आहे. आज हा शो तुमच्या मते नाही तर माझ्यानुसार चालेल. ज्यानंतर 'बेबी जॉन'ची संपूर्ण टीम एंट्री करते. वरुण धवन, कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि ॲटली या शोमध्ये खूप हसताना देखील प्रोमोमध्ये दिसत आहेत. याशिवाय प्रोमोमध्ये वरुण धवन हा कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील मागील भांडणाचाही उल्लेख करतो. यानंतर तिथे उपस्थित असणारे अनेकजण हसतात.
यशराज मुखातेचा नवीन व्हिडिओ : दरम्यान आता सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर यशराज मुखातेनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कीर्ती सुरेश असून ती एका मुलाखतीत डोसा पसंत असल्याचं सांगताना दिसत आहे. आता यावर यशराज मुखातेनं एक गाणं तयार केलं आहे. या गाण्याचं नाव त्यानं 'डोसा' दिला आहे. आता यशराजनं त्याचं गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या गाण्याच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन त्याचे कौतुक करत आहेत. यापूर्वी 'रसोडे में कौन था' हे यशराजचं गाणं खूप प्रसिद्ध झालं होत. दरम्यान वरुण धवनचा 'बेबी जॉन ' हा चित्रपट 25 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कॅलिस दिग्दर्शित आणि ऍटली, प्रिया ऍटली आणि ज्योती देशपांडे निर्मित, हा चित्रपट 'थेरी' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
हेही वाचा :