ETV Bharat / entertainment

'लाईफ लाईन'मध्ये २ ऑगस्टला रंगणार अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्यात पराकोटीचा संघर्ष - Marathi movie Life Line

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 12:49 PM IST

Updated : Jun 26, 2024, 2:15 PM IST

Marathi movie Life Line : अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला 'लाईफ लाईन' हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात र्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचं नवीन पोस्टर लॉन्च केलं आहे.

Ashok Saraf-Madhav Abhyankar
अशोक सराफ - माधव अभ्यंकर (Life Line poster)

मुंबई - Marathi movie Life Line : मराठी चित्रपट दर्जेदार कथानक आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. विषयाची विविधता, अनुभव देणाऱ्या आपल्या आसपासच्या गोष्टींचं यथार्थ चित्रण रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतं. विधात्यानं तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयानं घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेता माधव अभ्यंकर दिसत असून अशोक सराफ यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप आणि माधव अभ्यंकर यांच्या गळ्यातील तुळशीमाळ यावरून या दोघांमधील मतभेदाचा अंदाज प्रेक्षकांना येऊ शकतो. मात्र हा मतभेद कोणत्या कारणावरून आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे.

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, या चित्रपटात हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते आहेत लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट. राजेश शिरवईकर यांची कथा, पटकथा, संवाद आणि गीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली असून या भावपूर्ण गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे. 'लाईफ लाईन' हा चित्रपट ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी आहे.

'लाईफ लाईन' चे तरुण दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, "अतिशय नाजूक विषय असल्यामुळे अतिशय संवेदनशीलरित्या आम्ही तो मांडला आहे. विज्ञान आणि जुन्या परंपरा यात नेहमीच तफावत राहिलेली आहे. प्रत्येकाची विचारसरणी बदलणारा 'लाईफ लाईन' आहे. कथानक, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने मला खात्री आहे, हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.''

हेही वाचा -

  1. प्रिन्स नरुला आणि युविका चौधरीच्या घरी होईल छोट्या पाहूण्याचं आगमन, केली पोस्ट शेअर - yuvika chaudhary pregnancy
  2. क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचं केलं कौतुक - chandu champion
  3. झहीर इक्बालनं पत्नी सोनाक्षी सिन्हाला गिफ्ट केली बीएमडब्लू आय 7 कार - Zaheer Iqbal and Sonakshi Sinha

Last Updated : Jun 26, 2024, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.