ETV Bharat / entertainment

कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह लग्नाची पहिली पत्रिका घेऊन पोहचली काशी विश्वनाथ मंदिरात - Arti singh wedding - ARTI SINGH WEDDING

Arti singh wedding : कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह ही विवाह बेडीत अडकणार आहे. आरती तिच्या लग्नाचे पहिले कार्ड घेऊन काशी विश्वनाथ मंदिरात पोहचल्याचमं पाहायला मिळालं.

Arti singh wedding
आरती सिंहचं लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 1:16 PM IST

मुंबई - Arti singh wedding : स्टार कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आता आरतीच्या लग्नाला फक्त एक आठवडा उरला आहे. अलीकडेच आरतीच्या घरी लग्नाआधी माता राणीचं जागर झालं होतं. यानंतर सर्व नातेवाईकांसाठी एक पार्टी देण्यात आली होती. आरतीनं सर्व जागरणचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान आरती काशी विश्वनाथ मंदिरात लग्नाचे पहिले कार्ड घेऊन महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली आहे. आता सोशल मीडियावर आरतीचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात ती लाल रंगाचा ड्रेसमध्ये दिसत आहे.

कृष्णा अभिषेकच्या बहीणीचं लग्न : व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात लाल रंगाची लग्नपत्रिका दिसत आहे. या पत्रिकेत आरती आणि दीपक असं लिहिलं आहे. आरती बिझनेसमन दीपक चौहानबरोबर लग्न करणार आहे. आरतीचं दीपकबरोबरचं नात तिच्या मावशीनं पक्के केले आहे. आरतीचा लग्नासाठी होकार मिळविण्यासाठी दीपकनं अनेक प्रयत्न केले होते. आता आरतीनं लग्नासाठी होकार दिल्यानंतर 25 एप्रिल रोजी हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. आरती सिंहचे चाहते तिच्या लग्नाची वाट आतुरतेनं पाहात आहेत.

आरती सिंगच्या लग्नात हजेरी लावणार 'हे' कलाकार : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चे सर्व कॉमेडियन आरती सिंहच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत, ज्यात कपिल शर्मा, सुनील ग्रोवर, अर्चना पूरण सिंह आणि किकू शारदा यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, सेलेब्समध्ये गोविंदा, बिपाशा बसू, करण सिंग ग्रोव्हर, रश्मी देसाई, शैफवी जरीवाला, अयाज खान,आणि समीर सोनी पत्नी नीलमबरोबर येणार आहेत. दरम्यान आरतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं 2007 मध्ये 'मायका' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर तिनं अनेक मालिकांमध्ये काम केलं, ज्यात 'थोडा है बस थोडे की जरूरत है', 'वारिस' आणि 'परिचय' यामधून तिला खरी ओळख मिळाली. याशिवाय ती 'बिग बॉस'मध्ये देखील दिसली आहे.

हेही वाचा :

  1. 'दो और दो प्यार'च्या स्क्रिनिंगदरम्यान विद्या बालन आणि कार्तिक आर्यननं केली धमाल, व्हिडिओ व्हायरल - vidya balan
  2. सुनील शेट्टीनं जावई केएल राहुलला 32व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा, केला फोटो शेअर - KL Rahul 32nd Birthday
  3. शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ, रक्षकांच्या गराड्यात किंग खान विमानतळावर दिसला - पाहा व्हिडिओ - Shah Rukh Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.