ETV Bharat / entertainment

गोविंदाची भाची आरती सिंहच्या संगीत सोहळ्यामधील करण सिंग ग्रोव्हरनं केला व्हिडिओ शेअर - arti singh sangeet night - ARTI SINGH SANGEET NIGHT

Arti Singh Sangeet Night : कृष्णा अभिषेकची बहिण आरती सिंह उद्योगपती दीपक चौहानबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. आता काल 23 एप्रिल रोजी संगीत सोहळा हा संपन्न झाला. या सोहळ्यामधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Arti Singh Sangeet Night
आरती सिंहचा संगीत सोहळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 1:22 PM IST

मुंबई - Arti Singh Sangeet Night : 'बिग बॉस 13' ची स्पर्धक-गोविंदाची भाची आरती सिंह 25 एप्रिल रोजी मुंबईतील उद्योगपती दीपक चौहानबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाआधी ती तिच्या प्री-वेडिंगचा खूप आनंद घेत आहे. 23 एप्रिल रोजी संगीत सोहळा होता, ज्यामध्ये चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोक उपस्थित होते. संगीत सोहळ्यातील नववधूचा एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये ती सुंदर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, आरती तिच्या कुटुंबाला समर्पित परफॉर्मन्स देत आहे. तिचा हा व्हिडिओ फायटर अभिनेता करण सिंग ग्रोव्हरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

करण सिंग ग्रोव्हरनं आरती सिंहचा केला व्हिडिओ शेअर : या पोस्टच्या कॅप्शनमध्ये करणनं लिहिलं, 'खरे प्रेम शोधल्याबद्दल आरती आणि दीपिकचं अभिनंदन." करण सिंग ग्रोव्हरनं या कार्यक्रमात हजेरी लावली होती. व्हिडिओमध्ये आरती 'मुझे साजन के घर जाना है', 'आंगन गलियां चौबारा' या जुन्या गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आरतीच्या कुटुंबातील काही जुन्या फोटोचीही झलक दाखवण्यात आली आहे. दरम्यान आरतीनं तिच्या संगीतासाठी चमकदार सोनेरी हिरवा स्लीव्हलेस लेहेंगा परिधान केला होता. आरती आणि दीपकच्या संगीत सोहळ्याचा आनंद अनेक सेलिब्रिटींनी लुटला.

संगीत सेरेमनी 'या' कलाकारांनी लावली हजेरी : या कार्यक्रमात अंकिता लोखंडे, विकी जैन, पारस छाबरा, माहिरा शर्मा, करण सिंग ग्रोवर, रश्मी देसाई, हिंदुस्थानी भाऊ, देवोलिना भट्टाचार्जी, शेफाली जरीवाला आणि विशाल आदित्य सिंग यांनी पापाराझीला फोटोसाठी पोझ दिली.आरतीच्या संगीत सोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय या कार्यक्रमात एक्स जोडपे पारस छाबरा आणि माहिरा शर्मा हे एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय बिग बॉस 13 चे जवळपास सर्व स्पर्धक या कार्यक्रमात एकत्र दिसले. सध्या आरतीचं लग्न खूप चर्चा विषय सोशल मीडियावर बनला आहे. अनेकजण आरतीला तिच्या भावी भविष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. रणवीर सिंह डिप फेक व्हिडिओ प्रकरण : व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांनी पाठवली नोटीस - Ranveer Singh Deep fake Video
  2. 'कुली'साठी रजनीकांतनं घेतलं 300 कोटींचं मानधन, ठरला आशियातील सर्वात महागडा स्टार? - Rajinikanth
  3. मनोज बाजपेयीच्या वाढदिवसानिमित्त 'भैय्या जी'मधील 'बाग का करेजा' गाण्याचा टीझर रिलीज - manoj bajpayee birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.