मुंबई - Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी 3'च्या 29 व्या दिवशी युट्युबर अरमान मलिकनं 'बिग बॉस ओटीटी 2' विजेता एल्विश यादववर जोरदार टीका केली. घरातील सदस्य साई केतन रावशी झालेल्या संभाषणात, अरमाननं एल्विशची गाणी आणि व्लॉग्सला ट्रोल केले आणि सांगितलं की तो देखील भाग्यवान आहे, म्हणूनच तो इतका प्रसिद्ध आहे. अनेकजण एल्विश यादव सपोर्ट करत आहे, त्याच्या काही प्रतिभा नाही ना त्याला अभिनय माहित आहे ना गाणे, त्याला व्लॉग कसा बनवायचा हे देखील माहित नाही. तो फक्त त्याच्या नशिबामुळे प्रसिद्ध आहे. असे काही लोक असतात ज्यांच्याकडे टॅलेंट असते, तर काही लोक असे असतात जे त्यांच्या नशिबानं प्रसिद्ध होतात."
पायल मलिकनं केली धक्कादायक घोषणा : यापूर्वी त्यानं मला त्रास दिला आहे, त्याला नेहमी इतरांचा अपमान करणे आवडते. एल्विश बिगनं बॉसमध्ये प्रवेश केल्यापासून त्याला अनेकजण सपोर्ट करतात. दरम्यान, अलीकडेच 'बिग बॉस ओटीटी 3' मधून बाहेर आलेल्या पायल मलिकनं अरमान मलिकपासून वेगळे व्हायचं असल्याची धक्कादायक घोषणा केली आहे. तिनं तिच्या व्लॉगमध्ये म्हटलं आहे की, तिला तिच्या लग्नाबाबत द्वेष आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्याचा नकारात्मक परिणाम तिच्या मुलांवर होऊ लागला आहे आणि ती आता सहन करू शकत नाही. अरमान अजूनही त्याची दुसरी पत्नी कृतिकाबरोबर शोमध्ये आहे.
Bro 😭😭😭#ArmaanMalik R0STED #ElvishYadav and owned him completely by facts 😂💯.
— 𝐉𝐚𝐭𝐢𝐧🗨️ (@JatinGurjar1001) July 19, 2024
Na singer accha , na actor accha ,na vlogger accha bus luck se ban gya 😭🔥.#LuvKataria #SaiKetanRao #BiggBossOTT3 pic.twitter.com/l26GQdMRQO
'बिग बॉस ओटीटी 3'मधील स्पर्धक : अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी 3' होस्ट करत आहे. हा शो जिओ सिनेमावर लाइव्ह स्ट्रीम केला जात आहे. यात विशाल पांडे, सना सुलतान, सना मकबुल, नेजी, कृतिका मलिक, सई केतन राव, दीपक चौरसिया, मनीषा कुमारी आणि रणवीर शौरी हे स्पर्धक आहेत. या शोमध्ये कृतिका अरमान मलिक हे दोघेही चर्चेत आहे. आता या शोचा ग्रॅड फिनाले हा ऑगस्टमध्ये असल्याचं समजत आहे. हा शो कोण जिंकणार आता अनेकांना याबद्दलची उत्सुकता आहे.