मुंबई - Aditya Dhar next film : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. त्यानं 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'चे प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धर यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेलं नाही. सोमवारी अर्जुननं इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर फोटो शेअर करा
एका फोटोत अभिनेता अर्जुन रामपाल काळ्या रंगाचा टी-शर्ट, पँट आणि सनग्लासेस घालून मेकअप खुर्चीवर बसलेला दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय की, 'शूटिंग सुरू झालं आहे, मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.' या चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. पण यात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिका असल्याचं सांगितलं जातं.
हा चित्रपट पीरियड वॉर रोमँटिक ड्रामा आहे
या प्रोजेक्टशिवाय अर्जुन रामपालकडं 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' हा चित्रपटदेखील आहे. हा चित्रपट एक पीरियड वॉर रोमँटिक ड्रामा आहे, यामध्ये कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईच्या घटनांचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये तो योद्धा सिद्धनाक महार इनामदार यांची भूमिका साकारणार आहे. पुण्यातील पेशवाई सत्तेच्या विरोधात ब्रिटीशांच्या महार रेजिमेंटनं मोठा हल्ला केला होता आणि पेशव्याच्या प्रचंड सैन्याचा मोजक्या सैनिकांच्या फलटणीनं पराभव केला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर दिगांगना सूर्यवंशी दिसणार आहे. रमेश थेटे यांनी त्यांच्या रमेश थेटे फिल्म्स या बॅनरखाली दिग्दर्शित आणि निर्मित केलेला हा चित्रपट १ जानेवारी १८१८ च्या लढाईवर आधारित आहे.
अर्जुन रामपाल शेवटचा 'क्रॅक' चित्रपटात दिसला होता, या चित्रपटात नोरा फतेही आणि विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत होते. आगामी प्रोजक्टमध्ये त्याच्याकडे 'नास्तिक' आणि '3 मंकीज' हे चित्रपट आहेत. याशिवाय कंगना रणौतच्या 'धाकड' या चित्रपटात तो खलनायक रुद्रवीरच्या भूमिकेत दिसला होता.