ETV Bharat / entertainment

अर्जुन बिजलानी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ... - निक्की शर्मा आणि अर्जुन बिजलानी

Shiv Shakti Fame Nikki Sharma : टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक अभिनेत्री सिमेंटनं माखलेली दिसत आहे.

Shiv Shakti Fame Nikki Sharma
शिवशक्ती फेम निक्की शर्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 3:53 PM IST

मुंबई Shiv Shakti Fame Nikki Sharma : टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक अभिनेत्री सिमेंटनं मळलेली दिसत आहे. ही अभिनेत्री थंडीनं थरथर कापताना दिसत असून अर्जुन तिची मदत करताना दिसत आहे. अभिनेत्रीची अवस्था पाहून अनेकजण चिंतेत आहेत. ही अभिनेत्री कोण आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचं असेल तर बातमी वाचा. टीव्ही शो 'प्यार का पहला अध्याय शिव शक्ती'च्या शूटिंगदरम्यानमधील काही दृश्य अनेकदा व्हायरल होतात. मात्र यावेळी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीसाठी आता अनेकजण काळजी करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून या अभिनेत्रीच्या तब्येतीविषयी विचारत आहे.

अर्जुन बिजलानीनं शेअर केला व्हिडिओ : व्हिडिओमध्ये दुःखात दिसणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून निक्की शर्मा आहे. या व्हिडिओमध्ये सिमेंटनं मळलेली निक्कीची अवस्था खूप वाईट झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ एका सीनच्या शूटिंगदरम्यानचा आहे. जिथे निक्की शर्माला सिमेंटनं माखलेली भूमिका करायची होती. या सीनदरम्यान ती सिमेंटनं माखलेली आणि स्वत:वर नियंत्रण ठेवताना दिसत आहे. निक्की थंडीमुळे थरथर कापत आहे. यादरम्यान अर्जुन तिची खूप काळजी घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अर्जुन निक्कीचा हात चोळताना दिसत आहे. याशिवाय टीम मेंबर्सही निक्कीची काळजी घेत आहेत.

सिमेंटनं माखल्याने निक्की शर्माची प्रकृती बिघडली : व्हिडिओत निक्कीच्या डोळ्यात गेलेले सिमेंट सर्वजण काढत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर निक्कीच्या चाहत्यांनाही तिची खूप काळजी वाटू लागली आहे. निक्कीचा हा व्हिडिओ पाहताना काही चाहते तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. या सीनमध्ये दाखवण्यात आलेला सिमेंट खरा नाही, फक्त शूटिंगसाठी पाण्यात काहीतरी मिसळले आहे जे सिमेंटसारखे दिसत आहे. निक्कीनं या सीनचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, ''मी खूप कठीण सीक्वेंससाठी शूट केले आहे, शक्तीमध्ये खरोखर खूप शक्ती आहे.'' हा सीन शूट करत असताना निक्कीची प्रकृती गंभीर असल्याची दिसली आहे.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोणचा बाफ्टा 2024 मधील ब्रॅडली कूपर आणि किलियन मर्फीबरोबरचा फोटो व्हायरल
  2. जॅकी भगनानीबरोबर लग्नानंतर रकुल प्रीत सिंगची पहिली 'रसोई'
  3. टायगर श्रॉफच्या परफॉर्मन्सनं वुमन्स प्रीमियर लीग २०२४ च्या प्रेक्षकांना घातली भुरळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.