मुंबई - भारतीय फलंदाज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आज 11 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. आता सध्या हे जोडपे भारतात नसून बऱ्याच दिवसांपासून लंडनला राहत आहे. आजचा दिवस विराट आणि अनुष्कासाठी खूप विशेष आहे. आता यानिमित्तानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चाहत्यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकदा भारताच्या सामन्यांदरम्यान अनुष्काही स्टेडियममध्ये विराटला सपोर्ट करण्यासाठी जात असते. अलीकडेच ती पर्थमध्ये कोहलीच्या शतकावेळीही तिथे उपस्थित होती. यादरम्यान कोहलीनंअनुष्काला फ्लाइंग किस दिला होता, यानंतर तो चर्चेत आला.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा लग्नाचा वाढदिवस : पर्थमध्ये 30वे कसोटी शतक झळकावल्यानंतर विराटनं ते पत्नी अनुष्काला समर्पित केले. ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर सीरीज 1-1 अशी बरोबरीत आहे. आता गाबा येथील तिसऱ्या कसोटीसाठी कोहली सध्या जोरदार तयारी करत आहे. दरम्यान अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही. डिसेंबर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिरो' चित्रपटात शेवटी अनुष्का मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात शाहरुख खान आणि कतरिना देखील होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. दरम्यान 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न झाल्यानंतर अनुष्का तिच्या वैवाहिक जीवनात व्यग्र झाली. मात्र, यानंतर ती 2023 मध्ये 'काला' चित्रपटात कॅमिओ करताना दिसली होती. आता पुढं ती 'चकडा एक्सप्रेस' या आगामी चित्रपटात माजी भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका करताना दिसणार आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाला आता 7 वर्ष पूर्ण झाले आहेत.
Serving couple goals ft. Virushka 🥰
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) December 11, 2024
Wishing a very happy wedding anniversary to the power couple, Anushka and Virat. Here’s to many more beautiful years together, and may you inspire each other and the rest of the world! 👩❤️👨@imVkohli @AnushkaSharma | #PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/tG1TMX6YVl
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दिल्या चाहत्यांनी शुभेच्छा : दरम्यान विराट कोहलीची आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'विरुष्का कपल गोल्स चांगल्या पद्धतीनं पूर्ण करत आहे. पॉवर कपल, अनुष्का आणि विराट यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणखी बरीच सुंदर वर्षे तुम्हा दोघांची वाट पाहत आहेत. तुम्ही एकमेकांना आणि उर्वरित जगाला प्रेरणा देत राहा!' आता या पोस्टवर चाहते विराट आणि अनुष्का त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा :