मुंबई - Anushka Sharma and virat kohli : स्टार कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विराट आणि अनुष्का लंडनमध्ये आहेत. 2024 चा टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांबरोबर लंडनला रवाना झाला. यानंतर आता लंडनमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का भजनात सहभागी होताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. त्याचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे.
An old video of my idol visit ISKCON Temple in London with Anushka Sharma🕉️❤️ pic.twitter.com/PxaJVNbjl0
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) July 8, 2024
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये स्थायिक? : व्हिडिओत विराट आणि अनुष्का जाऊन एका बाकावर आरामात बसून भजन ऐकत आहेत. उल्लेखनिय बाब म्हणजे, अनुष्का शर्मानं यावर्षी मुलगा अकायला जन्म दिला. अनुष्का तिच्या गर्भधारणेदरम्यान लंडनमध्येच राहिली. तिनं लंडनमध्येच अकायला जन्म दिला. यानंतर ती बरेचं दिवस लंडनमध्ये होती. अनुष्का शर्मा आणि विराटबाबत असं बोलले जातं की, ते लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र, या जोडप्यानं याबद्दल काहीही विधान केलं नाही. आता अनेकजण विराट आणि अनुष्का लंडनमध्ये स्थायिक झाल्याचा अंदाज लावताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण विराटला लंडनमध्ये स्थायिक झाल्याचे प्रश्न विचारताना दिसत आहेत.
Virat Anushka at Krishna Das Kirtan Show , in London ❤️ pic.twitter.com/IGuxPlMn2Q
— `` (@KohlifiedGal) June 17, 2023
अनुष्का शर्माचं वर्कफ्रंट : टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विजयी परेडनंतर मध्यरात्री लंडनला रवाना झाला होता. दरम्यान अनुष्का शर्मा बी-टाऊनमध्ये सध्या सक्रिय नाही. आता ती लंडनमध्ये आपल्या कुटुंबासह चांगला वेळ घालवत आहे. विराट आणि अनुष्का अनेकदा धार्मिकस्थळी देवदर्शनाला जात असतात. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'कनेडा' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता अर्जुन कपूर, दिलजीत दोसांझ हे कलाकार होते. आता पुढं 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अनुष्का झुलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे.