ETV Bharat / entertainment

अनुराग कश्यपनं लेकीच्या लग्नात डीजेवर केली धमाल, जावई शेन ग्रेगोयरनं वाजवला ढोल... - AALIYAH KASHYAP

अनुराग कश्यप यांची मुलगी आलियानं 11 डिसेंबर रोजी लग्न केलं. यानंतर रिसेप्शन पार्टीमधील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Aaliyah kashyaps wedding
आलिया कश्यपचं लग्न (Aaliyah kashyaps wedding - (Photo - ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 13, 2024, 12:04 PM IST

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यपनं अलीकडेच बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरबरोबर लग्न केलं. या लग्नाला फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. अनुराग हे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या मुलीच्या लग्नाबाबत चर्चेत आहे. आता अनुराग कश्यपनं मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहेत. यामध्ये ते डीजेचं काम करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अनुराग खूप खुश असल्याचे दिसत आहे. आता अनुरागचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगान व्हायरल होत आहे. आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयरच्या रिसेप्शन पार्टीमधील अनेक व्हिडिओ काही सेलिब्रिंटीनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर यांची रिसेप्शन पार्टी : आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयरच्या रिसेप्शनमधील काही फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्री श्वेता बसू प्रसादनं आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं,'लाडकीवाले', अभिनंदन आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर, तुम्हा दोघांना खूप प्रेम.' तसेच श्वेतानं आलियाची आई अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजलाही ही पोस्ट टॅग केली आहे. दरम्यान एका व्हिडिओमध्ये अनुराग कश्यपचा जावई शेन पत्नी आलियाबरोबर ड्रम वाजवताना दिसत आहे. दरम्यान मुलगी आलियाच्या लग्नामध्ये अनुराग कश्यपची वेगळी स्टाईल पाहायला मिळाली.

रिसेप्शन पार्टीमधील फोटो आणि व्हिडिओ आले समोर : व्हायरल व्हिडिओमध्ये अनुराग कश्यप हे हेडफोन घातलून डीजेप्रमाणे नाचताना दिसत आहे. याशिवाय त्यांच्याबरोबर इतर लोकही नाचत आहेत. रिसेप्शनमध्ये आलियानं गोल्डन ऑफ शोल्डर कॉर्सेट टॉप आणि ब्लॅक लाँग स्कर्ट घातल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे शेननं काळ्या रंगाच्या पँट सूट परिधान केला आहे. आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर यांनी बुधवारी, 11 डिसेंबर रोजी त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. आलिया आणि शेनच्या रिसेप्शन पार्टीत बी टाऊनच्या सर्व स्टार्सनी खूप एंजॉय केला. मुलगी आलियाच्या रिसेप्शन पार्टीत अनुराग कश्यपनं पांढऱ्या रंगाचा धोती-कुर्ता घातला होता. दरम्यान आता श्वेतानं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत, या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

  1. "मी खरं बोललो तर अभय देओल तोंड दाखवायला जागा राहणार नाही" : अनुराग कश्यप - ANURAG KASHYAP ON PANKAJ JHA
  2. अनुराग कश्यप, गुलशन देवय्या स्टारर 'बॅड कॉप'चा ट्रेलर रिलीज - Bad Cop trailer
  3. "फुकट सल्ला देणे बंद" म्हणत, अनुराग कश्यपने केला दृढ संकल्प - ANURAG KASHYAP ON NEWCOMERS

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.