मुंबई - टीव्ही, वेब मालिका आणि चित्रपटातून अप्रतिम भूमिका साकारुन चाहत्यांना प्रभावित करणारे ऋतुराज सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते स्वादुपिंडाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
ऋतुराजचा जवळचा मित्र अमित भेल याने एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर या दुःखद बातमीची पुष्टी करताना सांगितले की, "हृदयविकाराच्या झटक्याने ऋतुराज याचे निधन झाले. स्वादुपिंडाच्या उपचारासाठी त्यांना काही वेळापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला हृदयविकाराच्या काही गुंतागुंतीच्या समस्या होत्या आणि त्यातच त्याचे निधन झाले." ऋतुराज सिंगच्या अंत्यसंस्काराचा तपशील अद्याप उपलब्ध नाही.
ऋतुराज सिंग याच्या अचानक जाण्याने मनोरंजन उद्योगाला खूप दुःख झाले आहे, असंख्य चाहत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोक व्यक्त केला आहे. ऋतुराज सिंगने अनुपमा, ये रिश्ता क्या कहलाता है, कुटुंब, अभय 3, आणि नेव्हर किस योर बेस्ट फ्रेंड यासह विविध टेलिव्हिजन शोमधील भूमिका केल्या होत्या. त्याने 'सत्यमेव जयते 2' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' सारख्या यशस्वी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या, जिथे त्यांनी वरुण धवनच्या वडिलांची भूमिका केली होती.
त्याच्या कारकिर्दीच्या प्रवासावर बोलताना ऋतुराजने शेअर केले होते की, "छोट्या पडद्यावर, मी सर्व चॅनेल्ससाठी काम केले आहे, आणि प्रत्येक निर्मात्याने माझी अनेक वेळा पुनरावृत्ती केली आहे. आता, ओटीटी आणि चित्रपटांसोबतही तेच घडत आहे. मी एक काम पूर्ण करण्यापूर्वी, माझ्याकडे दुसरे काम येत आहे. हातात काही ना काहीतरी काम असतेच. मी 12 वर्षांचा असताना मुलांच्या थिएटर ग्रुपपासून सुरुवात केली आणि 17 व्या वर्षी मी बॅरी जॉनच्या व्यावसायिक गटात सामील झालो. मी 12 वर्षे त्यांच्यासोबत थिएटर केले, त्यानंतर दोन इंग्रजी चित्रपट आणि 1993 मध्ये , मी माझा पहिला टीव्ही शो केला आणि 25 वर्षे करत राहिलो. आता हे सर्व चित्रपट आणि डिजिटल स्पेसबद्दल आहे."
हेही वाचा -