ETV Bharat / entertainment

अनुपम खेरनं सोशल मीडियावर ज्युनियर एनटीआरबरोबरचा फोटो केला शेअर - anupam kher - ANUPAM KHER

Anupam Kher and Junior NTR : अनुपम खेरनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर साऊथ स्टार ज्युनियर एनटीआर दिसत आहे.

Anupam Kher  and Junior NTR
अनुपम खेर आणि ज्युनियर एनटीआर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 1:39 PM IST

मुंबई - Anupam Kher and Junior NTR : दिग्गज अभिनेता अनुपम खेर त्यांच्या दमदार अभिनयामुळे आणि सशक्त व्यक्तिरेखेसाठी नेहमीच चर्चेत असतो. याशिवाय तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.अनुपम खेर आणि साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलीकडेच अनुपमने मुंबईत ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. यानंतर त्यानं हा फोटो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला. याशिवाय त्यानं या पोस्टवर एक कौतुक करणारी नोट लिहिली होती. त्यांनी या नोटवर लिहिलं, "काल रात्री माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी एक अभिनेता ज्युनियर एनटीआरला भेटून खूप आनंद झाला. मला त्याचे काम खूप आवडते. तो दिवसेंदिवस पुढे जात राहो."

ज्युनियर एनटीआर आणि अनुपम खेरचा व्हिडिओ व्हायरल : अनुपम आणि ज्युनियर एनटीआरला एकत्र पाहून अनेकांना वाटले की, दोघेही एका चित्रपटामध्ये दिसणार आहे. अनुपम खेर यानं शेअर केलेल्या फोटोत तो क्रीम रंगाच्या पॅन्ट आणि पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहेत. दुसरीकडे ज्युनियर एनटीआर राखाडी पॅन्ट आणि काळ्या टी-शर्टमध्ये आहे. या फोटोसाठी दोघेही एकत्र सुंदर पोझ देताना दिसत आहेत. आता दोघेही कोणत्या कार्यक्रमात भेटले याचा खुलासा अद्याप झालेला नाही. आता हा फोटो अनेकांना आवडत आहे. या फोटोवर अनेकजण कमेंट करून ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाबद्दल वाट पाहात असल्याचं सांगताना दिसत आहे.

एनटीआर आणि अनुपम खेर यांचा वर्कफ्रंट : वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ज्युनियर एनटीआर सध्या हृतिक रोशनबरोबर 'वॉर 2'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. गेल्या महिन्यात तो ॲक्शन थ्रिलरच्या सीक्वेन्स सीन शूट करण्यासाठी एनटीआर मुंबईत आला होता. दरम्यान, अनुपम खेरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो यशराजच्या ''विजय 69' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रवाहित होईल. याशिवाय तो कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'मध्ये देखील दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. पुष्पा चक्रीवादळाचा उद्रेक होणार : करण जोहरनं 'पुष्पा पुष्पा' गाण्यातील अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं केलं कौतुक - Pushpa song
  2. छोट्या मुलानं आंटी म्हटल्यावर माधुरी दीक्षितनं दिली 'ही' प्रतिक्रिया - Madhuri Dixit
  3. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा-द रुल'मधील पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' रिलीज, पाहा व्हिडिओ - First song Pushpa Pushpa Released

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.